आपण सर्वांनाच माहीत आहे की, काही लोकांची त्वचा फारच संवेदनशील असते. म्हणजे काही लोकांच्या त्वचेवर काही ब्युटी प्रॉडक्ट्स वापरले तर त्वचेवर खाज, रॅशेज किंवा लाल चट्टे येतात. या समस्या फार कमी काळासाठी राहतात पण असं तुम्हाला नेहमी होत असेल तर तुमची त्वचा अधिक सेन्सिटीव्ह आहे आणि तुम्हाला त्वचेची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकांना हे माहित नसतं की, त्यांची त्वचा कोणत्या प्रकारची आहे. आज आम्ही तुम्हाला संवेदनशील त्वचेची काही लक्षणे सांगणार आहोत.
त्वचेचं लाल होणं संवेदनशील त्वचेचं लक्षण
त्वचा लाल होणं हा संवेदनशील त्वचेचा सामान्य संकेत आहे. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांना असा अनुभव अनेकदा येतो. जास्त वेळ उन्हात राहिल्याने किंवा अॅलर्जी असलेल्या एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्याने त्वचा लाल होते.
सहजपणे रॅशेज येणे
संवेदनशील त्वचेवर सहजपणे रॅशेज येतात. त्वचेवर पुन्हा पुन्हा रॅशेज किंवा लाल पुरळ येणं संवेदनशील त्वचेचा संकेत आहे. हे रॅशेज लवकर जातही नाही आणि याने व्यक्तीची चिडचिडही होते. जर एखाद्या प्रॉडक्टचा वापर केल्यावर तुम्हाला रॅशेज येत असतील तर वेळीच त्या प्रॉडक्टचा वापर बंद करा.
त्वचेवर खाज येणे
गरम पाण्याचा अधिक वापर केल्याने किंवा हॉट शॉवर घेतल्याने जर तुम्हाला त्वचेवर खाज आल्यासारखं वाटत असेल तर तुमची त्वचा संवेदनशील आहे असं समजा. त्यासोबतच त्वचा स्वच्छ करण्यासाठी अधिक क्लिंजरचा वापर केल्यानेही संवेदनशील त्वचेवर खाज येऊ लागते.
भेगा पडणे
संवेदनशील त्वचा आणि ड्राय त्वचा मॉइश्चरची गरज भागवण्यासाठी अधिक तेलाचं उत्पादन करते. ज्या कारणाने त्वचेचे पोर्स बंद होतात. त्यामुळे त्वचेवर भेगाही पडू लागतात. हे सतत होत असेल तर तुमची त्वचा संवेदनशील आहे.
जळजळ होणे
जे स्कीन प्रॉडक्ट्स तुमच्या त्वचेसाठी अधिक स्ट्रॉंग आहेत. जसे की, जेल, अल्कोहोलयुक्त प्रॉडक्ट्स किंवा अॅंटी-एजिंग प्रॉडक्ट्स इत्यादींचा वापर केल्याने त्वचेवर जळजळ होत असेल तर तुमची त्वचा संवेदनशील आहे.