(Image Credit : COCOHK)
प्रत्येक घरात सकाळी नाश्त्यासाठी काहीना काही केलं जातं. अनेकांना नाश्ता करण्याची सवय असते तर काही अजिबातच नाश्ता करत नाहीत. तसेच अलिकडे अनेकजण ऑफिसला जाण्याच्या धावपळीत नाश्ता विसरुन जातात. हे लोक थेट दुपारचं जेवण आणि त्यानंतर रात्री उशीरा जेवण करतात. तुम्हीही असं करता का? जर उत्तर हो असेल तर वेळीच सावध व्हा. कारण सकाळी नाश्ता न केल्याने जीवाला धोका होऊ शकतो. संशोधकांनी इशारा दिला आहे की, सकाळी नाश्ता न केल्यास हृदयरोगांचा धोका अनेक पटीने वाढतो.
अकाली मृत्यूचा धोका ५ पटीने वाढतो
(Image Credit : Radio NZ)
प्रिवेन्टिव कार्डिओलॉजीच्या यूरोपीय जर्नल 'द फाइंडिग्स'मध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, याप्रकारची जीवनशैली असणाऱ्या लोकांचा अकाली मृत्यू होण्याचा धोका ४ ते ५ पटीने वाढतो आणि त्यांना हृदयविकाराचा झटका पडण्याचा धोकाही अनेक पटीने वाढतो. या रिसर्चचे लेखक ब्राझीलचे साउ-पाउलो सरकारी विश्वविद्यालयाचे मार्कोस मिनीकुची म्हणाले की, 'आम्ही केलेल्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जेवण करण्याच्या किंवा काहीही खाण्याच्या चुकीच्या पद्धती सतत वापर राहिल्याने आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो, खासकरुन हृदयविकाराच्या झटक्यानंतर'.
११३ रुग्णांवर रिसर्च
त्यांनी सांगितले की, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या ११३ रुग्णांवर करण्यात आला. त्यांचं सरासरी वय ६० वर्षे होतं. यातील ७३ टक्के पुरुष होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आलं की, सकाली नाश्ता न करणारे रुग्ण ५८ टक्के होते, तर रात्रीचं जेवण उशीरा करणारे रुग्ण ५१ टक्के होते. आणि ४८ टक्के रुग्णांमध्ये दोन्ही सवयी आढळल्या.
नाश्त्यात डेअरी फूड, कार्ब्स आणि फळं खावीत
संशोधकांच्या टीमचा सल्ला आहे की, खाण्याची सवय सुधारण्यासाठी रात्रीचं जेवण आणि झोपण्याच्या वेळेत कमीत कमी २ तासांचं अंतर असायला हवं. टीमने सांगितलं की, 'एका चांगल्या नाश्त्यात जास्तीत जास्त फॅट फ्री किंवा लो फॅट डेअरी पदार्थ जसे की, दूध, दही आणि पनीर, कार्बोहायड्रेट्स जसे की, चपाती, भाजलेले ब्रेड, कडधान्य आणि फळांचा समावेश करावा'.
1) नारळ पाणी :
नारळ पाणी तुम्ही कधीही पिऊ शकता पण सकाळी नारळ पाणी पिण्याचे फायदे वेगळेच आहेत. नारळ पाण्याला एक कॅलरी ड्रिंकही म्हटलं जातं. यात अॅंटीऑक्सीडेंट्स, अमीनो-अॅसिड, एंजाइम्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी हे पोषक तत्व आढळतात. या गुणांमुळे महिलांची इम्यून सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासोबतच नारळाच्या पाण्यामुळे त्वचाही तजेलदार दिसते. त्यासोबतच नारळाच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होतेे. त्यामुळे सकाळी नाश्ता करण्याची संधी मिळाली नाही तर नारळाचं पाणी आवर्जून प्यावे.
2) सफरचंद
रोज एक सफरचंद खावे असे तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल. या फळामध्ये फ्लावनोईड हे अधिक प्रमाणात आढळतं. त्यामुळे हाडे आणखी मजबूत होतात. त्यासोबतच श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर ही समस्याही या फळाच्या सेवनाने दूर होते. त्यामुळे रोज सकाळी एक सफरचंद खावे.
3) दूध
दुधात अनेक आरोग्यदायी पोषक तत्वे असतात. त्यामुळे वय कोणतही असो रोज सकाळी एक ग्लास दूध प्यायल्यास तुम्हाला फायदा होतो. दुधामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळते. दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. यामुळे त्वचा, केस आणि हाडे मजबूत होतात. तसेच रोज एक ग्लास दूध प्यायल्यास अनेक आजार दूर राहतात.
4) काळे चणे
रात्री काळे चणे भिजवून ठेवून त्याचा सकाळी नाश्ता केल्यास चांगला फायदा मिळतो. काळे चणे खाल्ल्यास प्रोटीन, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन अधिक प्रमाणात मिळतात. याने दिवसाची सुरुवात चांगली होते. दिवसभर थकवा जाणवत नाही. एका रिसर्चनुसार सकाळी एक वाटी भिजवलेले चणे खाल्लास चांगला फायदा मिळतो.
5) ड्रायफ्रूट्स
मिक्स ड्रायफ्रूट्स जसे काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता एकत्र खाल्ल्यास फायदा होतो. ड्रायफ्रूट्समध्ये एनर्जीचा मोठा स्त्रोत असतो. त्यासोबतच ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आयुष्यही वाढतं. यांमध्ये फॅटी अॅसिड्स, प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन अधिक असतात. हे खाल्ल्याने महिलांचा हिमोग्लोबिन अधिक वाढतं.