(Image Credit : medscape.com)
स्लीप अॅपनिया ही एक अशी समस्या आहे, ज्यात या समस्येने पीडित व्यक्तीचा श्वास तो झोपेत असताना रोखला जातो. यादरम्यान शरीराला पूर्ण ऑक्सिजन मिळू शकत नाही. आणि अचानक श्वास रोखला गेल्याने ते झोपेतून खडबडून जागे होतात. तसेच उठल्यावर जोरात धापा टाकू लागतात.
या समस्येने पीडित काही लोक असेही असतात ज्यांना जागे झाल्यावर याची जाणीवही होत नाही की, झोपेत त्यांचा श्वास रोखला गेला होता. त्यामुळेच ते जोरजोरात श्वास घेत आहेत आणि त्यांना घाबरल्यासारखं वाटतंय.
स्लीप अॅपनिया काही वेळ घोरण्यासारखं असतं, ज्यात अनेक लोकांना हे कळू शकत नाही की, झोपेत ते घोरत आहेत. जर स्लीप अॅपनियाची समस्या असल्याचे वेळीच समजले नाही तर याने दुसऱ्याही समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. जसे की, रात्री पुरेशी झोप घेऊनही सकाळी थकव्यासारखं वाटणे, दिवसभर आळस येणे, मानसिक समस्या होणे, डायजेशन ठीकपणे न होणे, स्मरणशक्तीवर प्रभाव पडणे, पोटदुखी होणे, तसेच हार्ट फेलिअलसारखी स्थिती तयार करण्यासाठी ही समस्या कारणीभूत ठरू शकते.
स्लीप अॅपनियाच्या पारंपारिक उपचारात रात्री CPAP मास्क घालणे याचा समावेश आहे. पण काही लोक हा मास्क घालून झोपण्यात सहज नसतात. या समस्येने पीडित लोकांना त्यांच्या रोजच्या सवयींमध्ये बदल करावा लागलोत. यात सर्वात पहिला नंबर लागतो तो वजन नियंत्रणात ठेवण्याचा. रोज एक्सरसाइज, योगा आणि वॉक करावा. झोपण्याची जागा आणि पद्घत बदलत रहावी. अल्कोहोल आणि स्मोकिंगपासून दूर रहा. आणि तेव्हाही आराम मिळत नसेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.