उत्तम आरोग्यासाठी झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये मानसिक ताणतणाव जास्त असतो. यामुळे आजकाल बहुतेक लोकांना नीट झोप येत नाही. आपण किती तास झोपतो आणि किती तास आपल्याला चांगली झोप येते. यावरुन आपण किती हेल्दी आणि निरोगी आहोत, हे समजते.
स्लीप कॅल्क्युलेटर फायदेशीरजर तुम्हालाही झोप न येण्याची समस्या असेल आणि तुम्हाला तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर एक विशेष अॅप तुम्हाला यात मदत करेल. हे एक स्लीप कॅल्क्युलेटर आहे, जे आपल्याला सांगेल की कोणत्या वयोगटातील लोकांसाठी किती झोप आवश्यक आहे. हे स्लीप कॅल्क्युलेटर इंटिरियर एक्सपर्ट हिलेरीजच्या टीमने बनवले आहे. विशेष म्हणजे हे अॅप तुमच्या शरीराच्या ९० मिनिटांच्या नैसर्गिक झोप चक्रासह तुमची झोपेची वेळ ठरवेल.
या कॅल्क्युलेटरमध्ये जर तुम्ही सकाळी उठण्याची वेळ टाकली तर ते झोपण्याच्या अचूक वेळेची माहिती देईल. जर तुम्ही तुमच्या सकाळची सुरूवात सातला केली तर तुम्हाला रात्री ९ वाजून ४६ मिनिटांनी झोपावे लागेल किंवा जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे असाल तर सकाळी किती वाजता उठावे हे कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगेल. शरीराच्या नैसर्गिक कार्यांनुसार कॅल्क्युलेटरचे नियम बनवले गेले आहेत. तुमच्या उठण्याची आणि झोपेची नेमकी वेळ काय असावी हे कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगेल.
ऑनलाइन सर्वेक्षण काय सांगते?नुकत्याच झालेल्या ऑनलाइन सर्वेक्षणानुसार यूकेमधील निम्म्याहून अधिक लोक ८ ते ९ तास झोप घेऊ शकत नाहीत. यापैकी पुरुषांची संख्या अधिक आहे. सर्वेक्षणानुसार ब्रिटनमध्ये ५६ टक्के पुरुषांना पुरेशी झोप मिळत नाही. त्याचवेळी ५३ टक्के स्त्रिया देखील झोप पूर्ण करू शकत नाहीत. झोपेच्या अभावामुळे तुम्ही सुस्त राहता आणि ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
डॉक्टर काय म्हणतात?नॅशनल स्लीप फाउंडेशननुसार नवजात बाळाला सर्वात जास्त झोपेची आवश्यकता असते. ३ ते ११ महिन्यांच्या बाळाला दिवसात किमान १४-१५ तासांची झोप आवश्यकत असते. १२ महिन्यांपासून ३५ महिन्यांपर्यंतच्या मुलांना म्हणजेच एका वर्षापेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना १२ ते १४ तासांची झोप आवश्यक असते. तसेच १८ ते ६४ वयापर्यंत ७ ते ८ तास झोपेची आवश्यकता असते. त्यावरील वयोवृद्धांसाठी ७ ते ९ तासाची झोप आवश्यक आहे.