शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
3
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
4
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
5
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
6
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
7
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
8
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
9
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
10
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
11
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
12
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
14
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
15
संपादकीय: अभिजात मराठी!
16
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
17
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
18
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
19
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
20
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!

ऑफिसमध्ये ‘झोपा’- तुमचा पगार वाढेल !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 10:11 AM

Sleep: काही महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला पुरेशी झोप घेता आली नाही, तर अगदी पाच-दहा मिनिटांची ‘पॉवर नॅप’ही आपल्याला कशी ऊर्जा देऊन जाते, हे आपण मागच्या लेखात पाहिलं.

काही महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला पुरेशी झोप घेता आली नाही, तर अगदी पाच-दहा मिनिटांची ‘पॉवर नॅप’ही आपल्याला कशी ऊर्जा देऊन जाते, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. ‘पॉवर नॅप’च्यासंदर्भात नॅशनल स्लीप फाउंडेशननेही विस्तृत अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार एखाद्यानं अर्धा तास किंवा चाळीस मिनिटे पॉवर नॅप घेतली, तरी त्याची कार्यक्षमता तब्बल ३४ टक्क्यांनी वाढते. फक्त अर्ध्या तासाच्या आरामानं कर्मचाऱ्यांची उत्पादकता इतकी वाढत असेल, तर त्यासाठी कंपन्यांनीही खास डुलकीसाठीचा वेळ आपल्या कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे. काही मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना खास झाेपण्यासाठी, आरामासाठी असा वेळ देतात. त्या काळात कर्मचारी ‘पॉवर नॅप’ घेतात. यामुळे अनेकांची कार्यक्षमता वाढली आणि त्यांचा पगारही! कर्मचाऱ्यांची पुरेशी झोप झालेली नसल्यास त्याचा थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतो, ही बाबदेखील आता अभ्यासातून स्पष्ट झाली आहे. कंपन्यांची पॉलिसी ‘स्लीप फ्रेंडली’ असल्यास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढते. एवढंच नाही, या छोट्याशा झोपेमुळे आपली सजगताही थेट शंभर टक्क्यांपर्यंत वाढते. कर्मचारी आणि कंपनी या दोघांसाठीही हा फायद्याचा सौदा आहे. पॉवर नॅपमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणचं वातावरणही अमूलाग्र बदलून जातं.  पॉवर नॅप नेमकी घ्यायची कशी?१ - तज्ज्ञांच्या मते दुपारी दोन ते चार या वेळेत जर पॉवर नॅप घेतली, तर त्याचा अधिक फायदा होतो. तुमची सजगता, उत्पादकता, स्मरणशक्ती, कार्यक्षमता आदी अनेक गोष्टींमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो. २ - तुम्ही किती वेळ पॉवर नॅप घेता, यावरही त्याचा फायदा अवलंबून आहे. खूप कमी आणि खूप जास्त वेळ पॉवर नॅप घेतली, तर उलट त्याचे दुष्परिणामच दिसून येऊ शकतात. त्यामुळे पॉवर नॅप जास्तीत जास्त १५ ते ३० मिनिटेच घ्यावी. ३ - लक्षात ठेवा, जिथे तुम्ही पॉवर नॅप घेता आहात, ती जागा थोडी थंड, अंधारी असावी. खोलीत फार प्रकाश असेल तर डोळ्यांवर कापडी पट्टी ठेवावी किंवा आय मास्क लावावा. आजूबाजूला गोंगाट असल्यास कानाला इयर प्लगही तुम्ही लावू शकता.

टॅग्स :Healthआरोग्य