शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

एका रात्रीत 'या' एका कारणामुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 11:29 AM

अलिकडे झोपेबाबत वेगवेगळे रिसर्च सतत होत असतात. झोप ही आपल्या चांगल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे यातून सांगितलं जातं.

(Image Credit : Medical News Today)

अलिकडे झोपेबाबत वेगवेगळे रिसर्च सतत होत असतात. झोप ही आपल्या चांगल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे यातून सांगितलं जातं. अलिकडच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोकांचा झोपेचा कालावधीही कमी झालाय आणि झोपेच्या वेळाही बदलल्या आहेत. पण याकडे अनेकजण फार गंभीरतेने बघत नाहीत, आणि त्यांना वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, कमी झोप घेणे किंवा पुरेशी झोप घेणे याचा संबंध थेट ब्लड प्रेशरशी आहे. याआधी झोप आणि ब्लड प्रेशरसंबंधी अशाप्रकारची बाब समोर आली नव्हती.

(Image Credit : theweek.in)

सायकोसोमॅटिक मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या नव्या रिसर्चमध्ये कमी झोप घेणे किंवा झोपेची गुणवत्ता खराब असल्याने होणाऱ्या समस्यांची शक्यता सांगण्यात आल्या आहेत. या स्ट्रोक,  हार्ट अटॅक आणि हार्ट संबंधी समस्या वाढून मृत्युचा धोका वाढण्यासंबंधी शक्यतांची माहिती देण्यात आली आहे. 

(Image Credit : Medical News Today)

या रिसर्चचे मुख्य लेखक कॅरोलीन डॉयल यांनी सांगितले की, असे अनेक आजार आहेत ज्यांचां थेट संबंध झोपेशी असतो. यासाठी आम्ही झोप ब्लड प्रेशरला कशी कंट्रोल करते हे जाणून घेण्यासाठी हा रिसर्च केला. त्यांनी सांगितले की, या रिसर्चसाठी त्यांच्या टीमने ३०० लोकांच्या समूहाला एकत्र आणलं होतं.

(Image Credit : Washington Post)

डॉयल यांनी सांगितले की, या समूहात २१ ते ७० वयोगटातील पुरूष आणि महिलांचा समावेश होता. यांना या रिसर्चमध्ये सहभागी करून घेताना या गोष्टी काळजी घेण्यात आली की, यातील कुणालाही हार्ट संबंधी काही समस्या असू नये. त्यानंतर सर्वांनाच दोन दिवस पोर्टेबल ब्लड प्रेशर कफ देण्यात आला. या कफच्या माध्यमातून दररोज ४५ मिनिटाच्या अंतराने ब्लड प्रेशरचं रीडिंग घेतलं गेलं.

(Image Credit : Medical News Today)

त्यांनी पुढे सांगितले की, या सहभागी लोकांनी रात्रभर रिस्ट वॉचप्रमाणे एक्टिग्राफी(झोपेची गुणवत्ता मोजणारं यंत्र) घातलं होतं. याने त्यांच्या झोपेची गुणवत्ता मोजली गेली. सोबतच याचीही माहिती मिळाली की, जे लोक चांगली झोप घेऊ शकत नाहीयेत त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. म्हणजे या रिसर्चने ही बाब तर स्पष्ट झालं की, जे लोक पुरेशी झोप घेऊ शकले नाहीत किंवा चांगली झोप घेऊ शकत नाहीत त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. या रिसर्चच्या माध्यमातून हेही सांगण्यात आलं की, एका रात्रीची प्रॉपर आणि चांगली झोप कशाप्रकारे ब्लड प्रेशरला नियंत्रित करू शकते.

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग