सतत बीझी असणं आणि वाढता कामाचा ताण यांमुळे अनेकदा रात्री शांत झोप लागत नाही. अनेक लोक ही अपूर्ण झोप पूर्ण करण्यासाठी वीकेंडच्या दिवशी थोडं जास्त झोपण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, याचा आपल्या आरोग्याला किंवा अपूर्ण झोप पूर्ण करण्यासाठी फारसा फायदा होत नाही.
संशोधनामध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, काही दिवस अपूर्ण झोपेची भरपाई करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा नॉर्म रूटीनमध्ये परतणं फार कठिण असतं. हा रिसर्च अमेरिकेतील यूनिवर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरमध्ये करण्यात आला असून याचा रिपोर्ट जर्नल ऑफ करंट बायोलॉजीमध्ये छापण्यात आला आहे.
या प्लॅनिंगचा फारसा प्रभाव नाही
संशोधक केनेथ राइट यांनी सांगितल्यानुसार, 'संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांनुसार, आठवडाभर पूर्ण झोप न घेणं आणि आठवड्याच्या शेवटी वीकएन्डच्या दिवशी खूप झोपून अपूर्ण झोपेच भरपाई करण्याचा प्लॅन फारसा प्रभावी ठरत नाही. असं केल्याने शरीर थोडं रिकव्हर होतं, परंतु ते थोड्या वेळासाठीच.
या संशोधनासाठी 18 ते 39 वयोगटामधील 36 व्यक्तींना निवडण्यात आलं. यांना दोन आठवडे एका लॅबमध्ये राहण्यासाठी सांगितले. जिथे त्यांच्या जेवणासोबतच त्यांच्या झोपेवर नजर ठेवली जाणार होती.
बेसिक टेस्टिंग केल्यानंतर या लोकांचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. पहिल्या गटाला नऊ रात्रींसाठी प्रत्येक रात्र 9 तास झोपण्यास सांगितले. दुसऱ्या गटाला पाच दिवसांपर्यंत रात्री फक्त 5 तासांसाठी झोपण्यास सांगितले. पण त्यानंतर दुसऱ्या गटाला पुन्हा दोन दिवस तसंच पाच तास झोपण्यास सांगितले. तर तिसऱ्या समुहाला पूर्ण वेळ फक्त पाच तास झोपू दिलं.
ते दोन्ही गट ज्यांना पूर्ण झोप घेऊ दिली नाही. त्यांनी रात्री काही ना काही खाल्लं त्यामुळे त्यांचं वजन वाढल्याचं दिसून आलं. संशोधनादरम्यान, त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी आढळून आलं. ज्या लोकांना वीकेंडच्या दिवशी पाहिजे तेवढं झोपू दिलं त्यांच्यामध्ये थोडासा बदल दिसून आला नाही. पण जसा त्यांचा अपूर्ण झोपेचा दिनक्रम पुन्हा सुरु झाला तसा हा बदल पुन्हा नाहीसा झाला.
संशोधनाचे प्रमुख संशोधक क्रिस डिपनर यांनी सांगितलं की, 'संशोधनामध्ये शेवटी आम्हाला असं दिसून आलं ज्या लोकांनी वीकेंडच्या दिवशी झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या शरीरातील मेटाबॉलिज्मच्या पातळीमध्ये फारशी सुधारणा दिसून आली नव्हती.