मुंबई : आजच्या टेक्नोसॅव्ही विश्वात प्रत्येकजण हा मोबाईल वापरत असल्याचं पहायला मिळतं. मोबाईल ही गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय, असं बोललं जातं. सकाळी उठल्यापासून ते थेट झोपेपर्यंत मोबाईल सोबतच ठेवला जातो. एक क्षण देखील आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. पण मोबाईल जितका उपयोगी आहे, तितकेच त्याचे वाईट परिणामही होत असल्याचं समोर आलं आहे.
आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपताना स्मार्टफोन सोबत घेऊन झोपण्याची सवय आहे. तुम्हालाही अशीच सवय असेल तर सावध व्हा. कारण यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
(Health Tips: मानसिक तणावानं ग्रासले आहात?, तर मग हे नक्की वाचा)
तुमच्या फेव्हरेट स्मार्टफोनमधून मोठ्या प्रमाणात घातक गॅस निघत असतात. संशोधकांनी यामुळेच सावधानतेचा इशारा दिला आहे. संशोधकांच्या एका टीमने लिथियम-आयर्न बॅटरीमधून निघणा-या १०० हून अधिक विषारी गॅसचं परिक्षण केलं आहे. यामध्ये कार्बन मोनोऑक्साइडचाही समावेश आहे. यामुळे डोळे, त्वचा आणि नाकात जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. हा गॅस शरीराच्या ज्या अवयवांना थेट हाणी पोहोचवतो, तेवढ्याच प्रमाणात आजुबाजूच्या अवयवांनाही नुकसान पोहचवतो.
(Health 'असं' वजन कमी करायला जाल, तर 'भारी'च पडणार!)
चीनमधील इंस्टीट्यूट ऑफ एनबीसी डिफेंस अँड सिन्गुहा यूनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या संशोधनानुसार, अनेक मोबाईल यूझर्स हे गरम झाल्यानंतरही स्मार्टफोन वापरतात तसेच खराब चार्जरने मोबाईल चार्ज करतात. इंस्टीट्यूट ऑफ एनबीसी डिफेंसचे प्रोफेसर जी सन यांनी सांगितले की, सध्याच्या काळात नागरिक लिथियम ऑयर्न बॅटरीचा वापर करतात. यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.