धुम्रपानामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार होतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासोबतच याने इतरही काही गंभीर आजार होतात. त्यात आयुष्य कमी होणे ही सुद्धा एक समस्या आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, धुम्रपानामुळे केवळ आयुष्यच कमी होत असं नाही तर याने व्यक्ती २० वर्ष लवकर वृद्ध होतो. म्हणजे धुम्रपान करणाऱ्या तरुणाचं वय २० वर्षे असेल तर त्याचं क्रानलॉजिकल वय एखाद्या ४० वर्षाच्या व्यक्ती इतकं होऊ शकतं.
काय आहे क्रानलॉजिकल आणि बायलॉजिकल वय?
मानवी शरीराचं दोन प्रकारचं वय असतं, पहिलं क्रानलॉजिकल आणि दुसरं बायलॉजिकल. क्रानलॉजिकल हे व्यक्तीच्या जन्मापासून मोजलं जातं. तेच एखादी व्यकती कोणत्या वयाचा दिसतो, हे बायलॉजिकल वयाने मोजलं जातं.
रिसर्चमधून काय समोर आलं?
या रिसर्चनुसार, धुम्रपानाचे नुकसान जाणून घेण्यासाठी १४९, ००० तरुणांची ब्लड टेस्ट करण्यात आली. यातून हे समोर आलं की, धुम्रपान करणाऱ्या तरुणांचं क्रानलॉजिकल वय त्यांच्या पेक्षा वयाने दुप्पट असलेल्या व्यक्तींच्या बरोबर आहे. या रिसर्चमध्ये १० पैकी ७ असे धुम्रपान करणारे ज्यांचं वय ३० पेक्षा कमी होतं, त्याचं क्रानलॉजिकल वय ३१ ते ४० किंवा ४१ ते ५० दरम्यान आढळलं. या रिसर्चमध्ये सहभागी एकूण लोकांपैकी ४९,००० लोक स्मोकर्स होते आणि त्यांचं सरासरी वय हे ५३ आढळलं, जी चिंतेची बाब आहे.
या रिसर्चचे लेखन पोलिना मॉमोशिना म्हणाले की, 'स्मोकिंग आरोग्य बिघवण्यास आणि वयाआधीच निधन होण्याचं मोठं कारण आहे. याने वेगवेगळे आजारा होतात. तसेच या रिसर्चमध्ये नॉन स्मोकर्सच्या तुलनेत स्मोकिंग करणाऱ्यांचं वय वाढण्याच्या प्रक्रियेत वेग बघायला मिळाला. ही प्रक्रिया महिला आणि पुरुषांमध्ये समान होती.
या रिसर्चमधून हे समोर आलं की, स्मोकिंगच्या सवयीमुळे शरीराचं आतील होणाऱ्या नुकसानाचे आतापर्यंत जे अंदाज लावले जात होते, प्रत्यक्षात नुकसान त्याहूनही जास्त होतं. यातून हेही स्पष्ट झालं की, स्मोकिंगने केवळ बायलॉजिकलच नाही तर क्रानलॉजिकल वयही प्रभावित होतं.
७ हजारापेक्षा जास्त रसायने
अमेरिकन लंग असोसिएशनतर्फे नुकताच करण्यात आलेल्या संशोधनानुसार सिगारेट जळाल्यानंतर त्यातून ७ हजारापेक्षा जास्त रसायने निघतात. त्यापैकी ६९ तर एवढे हानिकारक रसायने असतात जे कॅन्सरची शक्यता वाढवितात. ही रसायने शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करुन आरोग्याला हानी पोहोचवतात. छातीच्या आजारांच्या तज्ज्ञांनुसार धुम्रपानामुळे शरीरावर आठ प्रकारे नुकसान होत असते.
सिगारेटच्या धुराचा शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होऊन ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सुमारे ५१ टक्के वाढते. संशोधनानुसार सिगारेट ओढल्याने मेंदुतील कॉर्टेक्सचा भाग पातळ होतो. यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागते. तसेच नियमित सिगरेट ओढल्याने उच्च रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि ह्रदय विकाराचा धोका निर्माण होतो. नियमित सिगरेट ओढल्याने यकृत मध्ये टार जमा होतो, त्यामुळे यकृतचा कॅन्सर वाढण्याची ९० टक्के शक्यता वाढते.