सिगारेट, हुक्का, विडी, चिलम किंवा ई-सिगारेट ओढणाऱ्या लोकांच्या डोक्यात धुकं जमा होतं. हे धुकं ठीक तसंच असतं जसं हिवाळ्यात शहरांमध्ये जमा होतं. तेही प्रदूषणासोबत. या धुक्याचं नुकसान हे आहे की, तुम्ही लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. हा खुलासा यूनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या दोन नवीन रिसर्चमधून समोर आला आहे.
यूनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, जर कुणी १४ वर्षापेक्षा कमी वयात स्मोकिंग सुरू करत असेल तर त्यांच्या डोक्यात मेंटल फॉग म्हणजे धुकं जमा होण्याचा धोका अधिक राहतो. कशाप्रकारचंही स्मोकिंग करणारे स्मोकिंग न करणाऱ्यांच्या तुलनेत योग्य निर्णय घेण्यात कमजोर असतात.
URMC मध्ये क्लीनिकल अॅन्ड ट्रान्सलेशनल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आणि या रिसर्चमध्ये सहभागी डोंगमेई ली म्हणाले की, आमच्या रिसर्चमधून ही बाब स्पष्ट होते की, स्मोकिंगची कोणतीही पद्धत मग ती पारंपारिक तंबाखूचा असो वा दुसऱ्या प्रकारासारखी वॅपिंग. याने मेंदूला नुकसान पोहोचतं. हा रिसर्च जर्नल टोबॅको इंडस्यूड डिजीज अॅन्ड प्लॉस वनमध्ये प्रकाशित झाला आहे.
(Image Credit : successpodcast.com)
हा रिसर्च करण्यासाठी १८ हजार मिडल आणि हायस्कूल विद्यार्थ्यांसोबत थेट बातचीत करण्यात आली. त्यासोबतच ८.८६ लाख लोकांसोबत फोनच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले. दोन्ही रिसर्चमधून एक बाब स्पष्टपणे समोर आली की, स्मोकिंग किंवा वॅपिंग करणारे धुक्याच्या या समस्येने ग्रस्त आहेत.
ही समस्या कोणत्याही वयाच्या स्मोकर्ससोबत होऊ शकते. स्मोकिंग केल्याने डोक्यात तयार होणाऱ्या धुक्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडतो. मग तो लहान मुलगा असो वा वयस्क किंवा वयोवृद्ध. डोंगमेई ली म्हणाले की, तरूणांमध्ये स्मोकिंगची सवय वाढत आहे. ही बाब फार चिंताजनक आहे. जर पुढच्या पिढीच्या मेंदूत धुकं जमा होत राहिलं तर ते योग्य निर्णय घेऊ शकणार नाहीत.
डोंगमेई ली म्हणाले की, ई-सिगारेटमध्ये हानिकारक पदार्थ कमी असतात पण निकोटिनचं प्रमाण तर तेवढंच असतं. अनेकदा हे प्रमाण जास्तही असतं. ज्या देशात ई-सिगारेट मान्य आहे तिथे स्थिती जास्त खराब आहे. किशोरावस्थेत स्मोकिंग केल्याने मेंदू वेगाने सक्रिय होऊ शकत नाही. त्याचा विकास थांबतो.
डोंगमेई ली म्हणाले की, जास्त निकोटिन मेंदू गेल्यावर मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. हे प्रत्येक प्रकारच्या स्मोकिंगसोबत होतं. काही लोक याला रिलॅक्सेशन आणि सेल्फ मेडिकेशनचं नाव देतात. पण हे नुकसानकारक आहे. याचा फायदा कुणालाच मिळत नाही. काही काळाने याचे भयंकर दुष्परिणाम दिसतात.