सेल्फी घेणे आणि सोशल मीडियात शेअर करणे ही आज सामान्य बाब झाली आहे. पण लोकांची हीच सेल्फी घेण्याची सवय एका गंभीर आजाराचं रुप घेत आहे हे अनेकांना माहीत नाही. याला मेडिकल सायन्समध्ये स्नॅपचॅट डिस्मोर्फिया हे नाव देण्यात आलं आहे. हा आजार केवळ मानसोपचार तज्ज्ञच नाही तर प्लास्टिक सर्जरीशी निगडीत लोकांसाठीही आव्हान ठरत आहे.
काय आहे हा आजार?
हा एकप्रकारचा मेंटर डिसऑर्डर आहे. ज्यात व्यक्ती आपली काल्पनिक प्रतिमा दाखवतो. इतर मानसिक आजारांप्रमाणेच या आजारातही मनासारखा फोटो न मिळाल्याने व्यक्तीचा चिडचिडेपणा वाढतो आणि ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते.
प्लास्टिक सर्जरीचं आव्हान
'स्नॅपचॅट डिस्मोर्फिया' हा आजार मोबाइलच्या फोटो अधिक चांगल्या करणाऱ्या सेल्फी फिल्टरमुळे होतो. आता हा आजार प्लास्टिक सर्जरीशी निगडीत लोकांसाठीही आव्हान ठरत आहे. याबाबत प्लास्टिक सर्जनचं म्हणनं आहे की, १० वर्षांपूर्वी लोक आपल्या लोकप्रिय अभिनेत्यांचा किंवा नेत्यांचा फोटो घेऊन येत असत आणि त्यांच्यासारखं दिसायचंय असं सांगत होते. पण आता लोक आपलाच सेल्फी घेऊन येतात, जो फोटो सेल्फी फिल्टरमुळे अधिक चांगला होतो.
डिप्रेशन वाढतं
सेल्फी फिल्टर चेहऱ्यावरील रेषा मिटवून चेहरा अधिक आकर्षक करतात. काहींमध्ये तर डोळ्यांना मोठं करणं आणि नाक टोकदार करणं असेही पर्याय असतात. हा फोटो इतका आकर्षक असतो की, काहींना त्यांच्या खऱ्या चेहऱ्यापेक्षा सेल्फी अधिक चांगली वाटते. हळूहळू ही क्रेझ डिस्मोर्फियाचं रुप धाण करते आणि व्यक्ती एकलकोंडा होतो.
असा करा यावर उपाय
मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, सेल्फी घेणे वाईट नाहीये. पण याची सवय लागणे फार घातक आहे. इतर मानसिक आजारांप्रमाणे यातही हाच सल्ला दिला जातो की, आपली फिजिकल सोशल लाइफ तशीच ठेवा. केवळ सोशल मीडियात राहू नका, आपल्या आजूबाजूच्या समाजाशी संपर्कात रहा.