काही खाण्याचे पदार्थ असे असतात की ते भिजवून खा्ल्ले तर आरोग्याला अधिक फायदा होतो. हे वाचल्यावर तुम्हाला अशा काही पदार्थांची नाव लक्षातही आली असतील. डॉ. अबरार मुलतानी यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनूसार आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत जे भिजवून खाल्ल्याने तुमच्या शरिराला बराच फायदा होतो. भिजवून ठेवल्याने यापैकी काही पदार्थांना मोड येतात व त्यामुळे त्याची पौष्टीकता दुप्पट वाढते...
बदाम भिजवून खाणेरात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास कॅल्शियम, झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच, भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप २ डायबिटीस असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.
चणे भिजवून खाणेरात्री भिजवलेले चणे सकाळी उठून खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतील. खरं तर चण्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थासोबतच व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. चणे खाणे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर चणे खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते.
मनुके भिजवून खाणेरात्रभर भिजून ठेवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने तसेच ते पाणी प्यायल्याने यातील अँटिऑक्सिडेन्ट कन्टेन्टमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व व्हायरस आणि बॅक्टरीयापासून संरक्षण मिळते. मनुक्यांमध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच हायपरटेन्शनची समस्याही दूर करते. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जास्त असल्याने अॅनिमिया होत नाही व लोहाचे प्रमाण वाढते. मनुका पचनक्रियेस मदत करतं कारण यात मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच यामध्ये फायबर आणि कॅलरी जास्त असल्याने हाड मजबूत होतात.
भिजवलेले मूग खाणेमूग भिजवले की मुगाला मोड येतात. मोड आलेले मूग नियमित खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. यातील मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम तसेच एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखी तत्व भरपूर असतात. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यातील फायबरमुळे पोटाचे विकार, पोटदुखणे या समस्या होत नाहीत. शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहते.यातील सायट्रोजन शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहतो.