(Image Credit : wsimag.com)
स्मार्टफोनच्या माध्यमातून बोटाच्या क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या सोशल साईट्स आता प्रत्येकाच्याच जीवनाचा महत्त्वाचा भाग झाल्या आहेत. गरजेपुरता त्याचा वापरही फायद्याचा आहे. पण आता स्मार्टफोनमधील वेगवेगळ्या अॅप्सने आणि सोशल साइट्सने माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवल्यासारखे बघायला मिळत आहे. अनेकांना स्मार्टफोनची किंवा त्यातील अॅप्सची सवयच लागली आहे. एकप्रकारचं गंभीर असं अॅडिक्शन अनेकांना झालं आहे.
एका रिसर्चनुसार, लोक दिवसातून १२ ते ३६ वेळा सोशल साईट्सवर लॉग इन करतात आणि साधारण २ ते ३ तास ते यावर सर्फिंग करतात. काही रिसर्च सांगतात की, सोशल साईट्सच्या माध्यमातून व्यक्तीला जगाशी कनेक्टेड असल्याचं समाधान तर मिळतं, पण याने डिप्रेशन, एकटेपणा, ईर्ष्या, अपेक्षाभंग अशाही समस्या वाढत आहेत.
अनेकांना त्यांना लागलेली ही सोशल साईट्सची लत किंवा सवय जाणवते सुद्धा पण ते जाणीवपूर्णक त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. तुम्हालाही अशीच सवय लागल्याचं जाणवत असेल आणि ही सवय सोडायची असेल काही गोष्टींची तुम्हाला काटेकोर पाळाव्या लागतील.
आयकॉन्स हाईड करा -
सुरुवातीला तुम्हाला असं काही करणं फार विचित्र किंवा त्रासदायक वाटेल. कारण सतत या गोष्टी बघण्याची तुम्हाला सवय लागलेली असते. त्यामुळे यापुढे काहीच दिसणार नसेल तर तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. पण असे केल्याने तुम्ही सतत या आयकॉन्सवर क्लिक करणे बंद होईल. हाच नियम कम्प्युटर आणि लॅपटॉपसाठीही लागू पडतो.
म्यूट करा नोटिफिकेशन्स-
सतत टूंग टूंग करुन तुम्हाला आपल्याकडे आकर्षित करणारे हे नोटिफिकेशन तुम्हाला त्रासदायक नाही का वाटत? तुम्हाला खरंच तुमची सोशल मीडियाची किंवा स्मार्टफोनची सवय बदलायची असेल तर सर्व नोटिफिकेशन म्यूट करा. कारण हे नोटिफिकेशन तुमचं लक्ष भरकटवू शकतात आणि तुम्हाला लॉग इन करण्यालाही भाग पाडतात. तसेही तुम्ही काही बघितले नाही तर जग बुडणार नाहीये.
झोपेतून उठल्यावर फोनपासून दूर रहा -
सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर कुणीही रात्रभर आलेले मेसेजेस किंवा नोटिफिकेशन चेक करतात. काही लोक तर निटपणे झोपेतूनही बाहेर आलेले नसतात, पण फोन बघण्याचा उतावळेपणा त्यांच्यात दिसतो. पण याचे आरोग्यवरही अनेक दुष्परिणाम होतात. अनेकजण असा विचार करतात की, बस्स पाट मिनिटे फोन बघतो आणि मग त्यात ते इतके गुंतले जातात की, त्यांना ऑफिसला उशीर होतो. अशात काहीच महत्त्वाचं काम नसताना फोन तुमच्यापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. रात्रीही फोन जवळ घेऊन झोपण्याची काहीच गरज नाही.
फोन दूर ठेवण्याबाबत गंभीर व्हा -
(Image Credit : consumeraffairs.com)
सद्याच्या लाइफस्टाइलमुळे सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणे हे जरा कुणासाठीही अवघडच आहे. कारण सोशल मीडियात आपल्या जीवनाचा, दैंनंदिन जगण्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण तरीही त्यावर कमीत कमी वेळ घालवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सतत किंवा दर पाच मिनिटाला सोशल साईट्स चेक करण्याऐवजी तुम्ही दिवसातून २ किंवा ३ वेळा चेक करा. हा वेळ तुम्ही तुमची दुसरी कामं आटोपण्यासाठी द्या, ज्यातून तुम्हाला फायदा होणार असेल.