उन्हाळा असो वा हिवाळा काही लोकांना शुगर युक्त किंवा सोडा असलेल्या सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय असते. पण या पेय पदार्थांचं जास्त सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. यामुळे आपलं वजन वाढतं. तसेच अनेक गंभीर आजरही होऊ शकतात.
अमेरिकेत भारतीय संशोधकांनुसार नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार, सॉफ्ट ड्रिंक्सच्या नियमित सेवनाच्या सवयीमुळे लिव्हर कॅन्सर आणि जास्त काळ लिव्हरवर सूज येण्याचा धोका वाढू शकतो. जे लोक दिवसातून एकदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सेवन करतात. त्यांना लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका 85 टक्के आणि क्रोनिक हेपेटायटिसने जीव जाण्याचा धोका 68 टक्के असतो.
एका कॅनमध्ये किती शुगर?
हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या रिपोर्टनुसार, सोडा, कोल्ड ड्रिंक, फ्रूट ज्यूस, एनर्जी ड्रिंक, स्वीट पावडर ड्रिंक आणि इतर गोड पेय पदार्थांच्या सेवनाने आरोग्य बिघडतं. यात कॅलरी आणि शुगरचं प्रमाण जास्त असतं.
स्टडीनुसार, एक चमचा शुगर ड्रिंकमध्ये 4.2 ग्रॅम शुगर असते आणि सोड्याच्या एका कॅनमध्ये साधारण 7 ते 10 चमचे शुगर असते. जास्तीत जास्त ड्रिंक्समध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं. यात कॅफीनही असतं जे ब्लड प्रेशर वाढतं व जास्त काळ प्यायल्याने डायबिटीसचा धोकाही वाढतो.
जास्त शुगर असलेले ड्रिंक्स पिण्याचे नुकसान
डॉक्टरांनी सांगितलं की, शुगर असलेले पेय पदार्थांचं नियमित सेवन केल्याने फायब्रोसिस, सिरोसिस आणि क्रोनिक लिव्हर इन्फ्लेमेशन (म्हणजे ल्व्हिरवर सूज) अशा समस्या होतात. शुगर वाढल्याने कॅन्सरचा धोकाही वाढतो.
सॉफ्ट ड्रिंक्सच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरात जास्त कॅलरी वाढतात ज्यामुळे लठ्ठपणा आणि ओबेसिटी होते. यामुळे शरीरात वेगवेगळी गंभीर समस्या वाढतात. गोड पेयांमुळे ब्लड ग्लूकोजची लेव्हलही वाढते. ज्यामुळे इंसुलिन रेजिस्टेंस होतं. जे लिव्हर कॅन्सर आणि लिव्हरसंबंधी आजारांचं मोठं कारण आहे.