कोरोना व्हायरस संसर्गाची चाचणी करण्यासाठी घरी चाचणी होणाऱ्या किटचा वापर वाढला आहे. अनेकवेळा लोक घरी कोरोना संसर्ग तपासण्यासाठी कोविड टेस्टिंग किट वापरतायत. यामुळे त्यांना कोविड - 19ची लागण झाली आहे की नाही हे कळू शकतं. परंतु एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
या अभ्यासानुसार, अशी काही ड्रिंक्स आहेत जी कोविड चाचणीच्या रिझल्टवर परिणाम करतात आणि पॉझिटिव्ह नसतानाही कोव्हिड पॉझिटिव्ह असा रिझल्ट (False Positive) देऊ शकतात. कोव्हिड होम टेस्टिंग किट (At-home Testing kits) हा कोरोना चाचणीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो कारण, ते सोयीस्कर आहे. तसेच यामुळे तुम्ही घरच्या घरी कोरोना चाचणी करु शकत असल्याने तुम्ही बाहेरचा संपर्क टाळता. पण या किटद्वारे टेस्ट करताना तुम्हाला काही ड्रिंक्सचे सेवन केले असल्यास कोव्हिड पॉझिटिव्ह असा रिझल्ट मिळू शकतो.
संसर्गाचा धोका टाळण्यासाठी, बर्याच लोकांना सार्वजनिक ठिकाणी चाचणीसाठी जाणं सुरक्षित वाटत नाही. तज्ज्ञ म्हणतात की, या किटवर विश्वास ठेवता येऊ शकतो. परंतु जर तुम्हाला पॉझिटीव्ह रिपोर्ट हवा असेल तर ते या किटवर दाखवणं शक्य आहे.
ड्रिंक्सचा परिणामसंक्रमित होणाऱ्या रोगांवर (Infectious disease) वर रिसर्च करणाऱ्या संशोधकांना असं आढळलं की, काही पेयांचा कोविड -१९ चाचणीवर परिणाम होतो. जर्मनीतील एका युनिव्हर्सिटीमध्ये (Tübingen University) मध्ये ट्रॉपिकल मेडिसिनचा (Tropical Medicine) अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिजीज (International Journal of Infectious Disease) यामध्ये प्रकाशित केला आहे.
वैज्ञानिकांनी या अभ्यासात सांगितलं की, आरटीपीसीआर टेस्ट (PCR COVID-19 Test) अजूनही कोव्हिडसाठी गोल्ड स्टँडर्ड मानली जाते. त्याच वेळी, कोविड -१९ अँटीजेन किटची स्व-चाचणी देखील सध्या मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. अशा किटचा वापर शाळा, वर्कप्लेस, घर या सर्व ठिकाणी केला जातो. या टेस्टने अचूक रिझल्ट देखील दिले आहेत.
संशोधक म्हणतात की, सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, अल्कोहोल, कमर्शियली बॉडल्ट मिनरल वॉटर आणि कार्बोनेटेड मिनरल वॉटर, टेस्टिंग किटवर रेड टेस्ट लाइन दाखवू शकतात. किटवरील रेड टेस्ट लाइन कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं दर्शवतं.