बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही आपल्या सुंदरतेसोबतच फिटनेससाठीही लोकप्रिय आहे. सोनमसारखी फिटनेस आणि फिगर मिळवण्याची तिच्या अनेक चाहत्यांची इच्छा असते. ती इतकी फिट कशी राहते? त्यासाठी ती काय करते? काय डाएट फॉलो करते? असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत असतात.
सोनम वर्कआउट करण्यासोबतच आपल्या डाएटवर खूप लक्ष देते. सोनमच्या फिटनेस ट्रेनर राधिका कार्लेने एका हेल्थ वेबसाईटला सोमनच्या फिटनेसचं गुपित सांगितलं आहे. सोनमच्या फिटनेस ट्रेनरने सांगितले की, सोमन नाश्ता, लंच आणि डिनरमध्ये काय आहात घेते.
नाश्ता
सोनम कपूर सकाली नाश्त्याला फळं खाते. ज्यात पोमेलो(पोपनस), बेरीज खाते. अॅंटी-ऑक्सिडेंटने भरपूर या फळांनी तिची सुरुवात झाल्यावर तिला दिवसभर एनर्जी मिळते. यासोबतच सोनम ग्लूटेन-फ्रि टोस्ट आणि अर्धा एवोकाडोसोबत बदामाच्या दुधाने तयार केलेली कॉफीही घेते. एवोकाडोमध्ये गुड फॅट असतात ज्याने पोट भरलेलं राहतं.
लंच
अर्धा कप भात, ७५ ग्रॅम मासे(उलळलेली साल्मन किंवा ग्रिल्ड मासा) हा सोनमच्या लंचचा मेन्यू आहे. माशांमधून शरीराला ओमेगा ३ फॅटी अॅसिड मिळते जे स्कीन मुलायम आणि हेल्थी ठेवतात. त्यासोबतच एक कप उकळलेली मोसंबी आणि भाज्या खाते.
डिनर
सोनम याची खूप काळजी घेते की, ती रात्री जेवण सायंकाळी ७.३० च्या आधी करेल. ती डिनरला व्हेजिटेबल सूप घेते. तिला घरी तायर केलेलं जेवण आवडतं. त्यासोबतच ती अर्धा कप शिजवलेल्या भाज्या, अर्धा कप बटाटे, भात किंवा फ्लॅट नूडल्स खाते.