शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

PCOS: प्रेग्नंट होण्याआधी 'या' आजाराचा सामना करत होती सोनम कपूर, पाहा तज्ज्ञ काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 7:05 PM

सोनम कपूर ३६ वर्षांची आहे आणि गर्भवती होण्यापूर्वी तिला PCOS आजाराचा सामना करावा लागला. PCOS हा एक असा आजार आहे ज्यामध्ये गर्भधारणा होणे कठीण होते. पीसीओएस बरा करणे तिच्यासाठी किती कठीण आणि आव्हानात्मक होतं हे सोनमने स्वतः सांगितलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Actress Sonam Kapoor) नुकतीच तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीबद्दल बातमी दिली. इन्स्टाग्रामवर सोनम आणि तिच्या पतीने पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनमने असंही सांगितले आहे की, माझी डिलिव्हरी (Sonam Kapoor preganncy) या वर्षी आहे आणि दोघेही नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, सोनम चार महिन्यांची गरोदर आहे आणि तिची प्रसूती ऑगस्टमध्ये होऊ शकते. याच कारणामुळे सोनम अनेक दिवस मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर होती. आता सोनमने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाचा खुलासा केला आहे.

सोनम कपूर ३६ वर्षांची आहे आणि गर्भवती होण्यापूर्वी तिला PCOS आजाराचा सामना करावा लागला. PCOS हा एक असा आजार आहे ज्यामध्ये गर्भधारणा होणे कठीण होते. पीसीओएस बरा करणे तिच्यासाठी किती कठीण आणि आव्हानात्मक होतं हे सोनमने स्वतः सांगितलं होतं. तिच्या प्रमाणेच अनेक महिलांना पीसीओएस असू शकतो, यासाठी महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या काही टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

सोनमचा PCOS मधील आहारसोनम कपूरने पीसीओएस असताना तिचा डाएट कसा होता, याची माहिती इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली होती. तिनं सांगितलं होतं की, ती फक्त ताज्या आणि हंगामी गोष्टी खाते.

नाश्ता सोनमने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती कोकोनट योगर्टसोबत मूठभर बेरी खात आहे. एक वाटी हिरव्या भाज्या सोबत पुदिना किंवा ग्रीन टी घेतल्याने ती दिवसभर एनर्जी राहत असल्याचे तिनं सांगितलं. सोनमने भरपूर हिरव्या भाज्या खाल्ल्या आहेत आणि अनेक वैद्यकीय तज्ज्ञ पीसीओएसच्या बाबतीत हिरव्या भाज्या, फळे आणि ओमेगा -3 समृद्ध पदार्थ खाण्याची शिफारस करतात.

साखरेवर नियंत्रणसोनमने PCOS बरा करण्यासाठी रिफाइंड शुगर पूर्णपणे बंद केल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिच्या आरोग्यात खूप बदल झाला.स्त्रीरोगतज्ज्ञांचे मतस्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना नरुला यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांना पीसीओएसचा त्रास आहे, त्यांनी सर्वप्रथम त्यांची हार्मोनल तपासणी करून घ्या आणि त्यांच्या शरीरात कोणते हार्मोन असंतुलन झाले आहे हे जाणून घ्या. चाचणीच्या अहवालानंतरच उपचार सुरू करता येतात.

डॉक्टर अर्चना सांगतात की, जर तुम्हाला पीसीओएस बरा करून गरोदर राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमची जीवनशैली बदला आणि तुमचे वजन जास्त असेल तर वजन कमी करा. याशिवाय तळलेले अन्न खाणं बंद करा. जेवणात भात, मैद्याचे पदार्थ खाणं बंद करा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, धान्य आणि फळांचा समावेश करा. PCOS मध्ये गर्भधारणेसाठी डॉ. अर्चना आठवड्यातून किमान तीन किंवा चार वेळा अर्धा तास व्यायाम करण्याचा सल्ला देतात.

टॅग्स :Healthआरोग्यSonam Kapoorसोनम कपूरPregnancyप्रेग्नंसी