पावसाळा सुरू झालाय. सृष्टी अत्यंत हिरवीगार दिसतेय. मात्र या पावसाळ्याने अनेक रोगांना आमंत्रण दिलंय. पावसाळा तुम्हाला कितीही आवडत असला तरी पावसाळ्यात होणारे गंभीर आजार हे पावसासोबत येतातच. त्यामुळे विशेषत: कोविडच्या परिस्थीतीच रोगांपासून बचाव करण्यावरच आपला भर असला पाहिजे. या पावसाळ्यातील आजाराबाबत आयुर्वेदिक डॉक्टर रेखा राधामनी यांनी व्हिडिओ द्वारे या रोगांपासून बचावण्याचे उपाय सांगितले आहेत.
कशी काळजी घ्यावी?डॉ. रेखा यांच्या मते पावसाळ्याच्या दिवसात पंचकर्मासारखे उपचार करून किंवा संतूलित आहाराचे सेवन करून काळजी घेऊ शकता.हलके आणि ताजे अन्न खावेउकळलेलं पाणी किंवा हर्बल टी प्यावीतेलकट खाऊ नये.शिळे अन्न खाऊ नकामधाचा वापर करातेला ऐवजी तुपाचा वापर कराजेवणानंतर ताक प्याएक वर्ष जुना तांदुळ जेवणात वापरा
शरीरातील तीन दोष संतुलित करणे आवश्यकवात, कफ, पित्त हे दोष संतुलित करणं आर्युवेदात अत्यंत महत्वाचं मानलं गेलंय. कफ दोषामुळे २८ रोग, वात दोषामुळे ८० रोग, पित्त दोषामुळे ४० रोग होत असल्याचं आर्युवेदात नमुद करण्यात आलं आहे.
मॉडरेट एक्सरसाईजडॉ. रेखा यांनी सांगितले आहे की, पावसाळ्यात जास्त हेवी एक्सरसाईज करू नका. या मौसमात मॉडरेट एक्सरसाईज करणंच योग्य आहे. यासाठी तुम्ही योगाही करू शकता.