जे पदार्थ सोयाबीनपासून तयार केलेले असतात त्यांना सोया नावाने ओळखलं जातं. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं. त्यासोबतच या शरीरासाठी आवश्यक अमीनो अॅसिडही आहे. सोया उत्पादनांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे याचं सेवन केल्याने हृदयरोग, ब्रेस्ट कॅन्सर आणि इतरही आजारांपासून बचाव होतो. पण याचे काही नुकसानही आहेत. चला जाणून घेऊन सोया प्रोटीनचे काही नुकसान आणि फायदे....
हृदयरोगापासून बचाव
सोया उत्पादनांच्या सेवनामुळे हृदय रोगापासून बचाव होतो. यात यात कोलेस्ट्रॉल आणि फॅटचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी असतो. जर तुम्ही रोज तुमच्या आहारात सोया उत्पादनांचा समावेश कराल तर तुमच्यासाठी ते फायद्याचं ठरु शकतं.
कोलोन कॅन्सरपासून बचाव
कोलोन कॅन्सर हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार पचनक्रियेशी संबंधित आहे. सोयापासून तयार पदार्थ खाल्यास तुम्हाला यातून सुटका मिळेल. अनेक शोधांनुसार, सोयाचे सेवन केल्याने कोलोन कॅन्सरचा धोका कमी होतो.
प्रोस्टट हेल्थ
सोया उत्पादनाचं सेवन केल्याने प्रोस्टेटची क्रियाशीलता वाढते. सोयामध्ये इसोफ्लेवेनॉन्स आढळतं जे अॅंटीऑक्सिडेंटने भरपूर असतं. त्यासोबतच याने प्रोस्टेटमध्ये कॅन्सरच्या पेशी वाढण्यास रोखतं.
हाडांना मजबूती
जे लोक सोया उत्पदानाचं सेवन करतात त्यांना हाडांशी संबधित समस्या जसे की, ऑस्टीयोपोरोसिस, अर्थरायटिस इत्यादी कमी होतात. खासकरुन महिलांनी सोया उत्पादनांचं सेवन आवर्जून केलं पाहिजे. कारण त्यांना हाडांच्या समस्या होण्याची शक्यता अधिक असते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
सोयामध्ये नैसर्गिक डिटरजेंट असतं, ज्याला सपोनिंस म्हटलं जातं. हे तत्व आतड्यांमधील कोलेस्ट्रॉलची स्वच्छता करतं. त्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
सोया प्रोटीनचे दुष्परिणाम
सोया स्नॅक्सचा वापर केल्याने कधी कधी नुकसान होऊ शकतं. सोया पौष्टिक असतं आणि यात अनेक फायदेशीर तत्वे असतात. पण जेव्हा तुम्ही सोयापासून तयार पदार्थांचं जास्त सेवन करता तेव्हा शरीरात भरपूर प्रमाणात एस्ट्रोजन जातं.