(Image Credit : www.livin3.com)
सडपातळ मुलींच्याही पोटाच्या भागात अनेकदा चरबी जमा होते. याला बेली फॅट म्हणतात. हे चरबीमुळे वाढलेलं पोट दिसायला फारच वाईट वाटतं. तसेच याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही निर्माण होतात. त्यामुळे योग्य आणि नियमित एक्सरसाइज करायला हवी. पोटावरील ही चरबी दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. त्यातीलच एक खास उपाय म्हणजे खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याच्या तेलातील पदार्थ खाल्ल्याने वजन वाढत नाही तर कमी होतं. या तेलात जेवण तयार केल्यास आणि ते खाल्ल्यास कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागते.
खोबऱ्याच्या तेलातील खास गुण
द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, हे तेल सौंदर्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. पण हे अनेकांना माहीत नाही की, या तेलाच्या सेवनामुळे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. इतर तेलांच्या तुलनते या तेलाची संरचना वेगळी असते. खोबऱ्याच्या तेलातील फॅटी अॅसिड चेन दुसऱ्या तेलांच्या फॅटी अॅसिड चेनच्या तुलनेत मध्यम आकाराची असते. याची स्मोक लेव्हलही कमी असते.
खोबऱ्याच्या तेलाच्या सेवनाचे फायदे
(Image Credit : www.healthymummy.com)
जेव्हा तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचं सेवन करता तेव्हा आधी ते संग्रहित होतं आणि नंतर तुटतं. याने चरबी जळते आणि पचनक्रियाही सुधारते. या कारणाने वजन कमी होण्याची गतीही वाढते. त्यासोबतच मध्यम आकाराच्या फॅटी अॅसिड चेनमुळे पोट जास्तवेळ भरलेलं जाणवतं. त्यामुळे तुम्ही जास्त काही खातही नाही.
काय सांगतो शोध?
लिपिड्स जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, खोबऱ्याच्या तेलाच्या सेवनाने चयापचयाचा दर वाढून फॅट बर्न होतं. याने पोटातील चरबी वेगाने कमी होते. सोबतच शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून हृदय सुद्धा निरोगी राहतं.
असा करा वापर
एका रिसर्चनुसार, रोज दोन मोठे चमचे(जवळपास ३० ग्रॅम) खोबऱ्याचं सेवन केल्याने वजन वेगाने कमी होईल. तसेच जेवण तयार करण्यासाठीही तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. या तेलाने भाजीची टेस्ट जरा वेगळी लागले. पण एक वेगळ्याप्रकारचा गोडवा सुद्धा येतो.
(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यातील उपाय वापरण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. त्याशिवाय डाएटमध्ये कोणताही बदल करू नये.)