Benefits of Tulsi tea : पावसाळा हा उन्हाळ्यानंतर दिलासा देणारा असतो. पण पावसाळा म्हटलं की, वेगवेगळे आजारही डोकं वर काढतात. जास्तीत जास्त आजार याच दिवसांमध्ये होतात. अशात आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं. या दिवसांमध्ये इम्यूनिटी कमजोर होते आणि पचन तंत्रही कमजोर होतं. ज्यामुळे पोटासंबंधी आणि आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.
सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डेंग्यू, डायरिया असे कितीतरी आजार या दिवसात जास्त होतात. मग यावर उपाय काय कराल? तर तुम्ही इम्यूनि़टी बूस्ट करण्यावर भर दिला पाहिजे. याचाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्ही या दिवसात एका खास चहाचं सेवन नियमितपणे करू शकता.
पावसाळ्यात इम्यूनिटी बूस्ट करणारा चहा
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात तुळशीचा चहा आरोग्यासाठी सगळ्यात चांगला ठरतो. तुळशी एक नॅचरल इम्यूनिटी बूस्टर आहे. यात भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात सोबतच यात अॅंटी बॅक्टेरिअल गुणही असतात. जे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनसोबत लढतात. यासाठी तुळशीची काही पाने उकडत्या पाण्यात टाका आणि गाळून घ्या. त्यात टेस्टनुसार थोडं मध टाका.
आल्याचा चहा
आलं सुद्धा आपल्या अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांसाठी पावसाळ्यात फार फायदेशीर मानलं जातं. या दिवसात आल्याचा चहा प्यायल्याने किंवा याचं वेगवेगळ्या पदार्थांमधून सेवन केल्याने खूप फायदा मिळू शकतो. यात भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-व्हायरल आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जे तुमचा सर्दी-खोकला, ताप, इन्फेक्शनपासून बचाव होतात.
आल्याचा चहा प्यायल्याने पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते. आल्यासोबतच तुम्ही या दिवसात लेमन टी, ग्रीन टी, पुदीना टी आणि मिंट टी चं सेवन करू शकता. लिंबामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच पुदीना आपल्या अॅंटी-बॅक्टेरिअल गुणामुळे पावसाळ्यात फायदेशीर ठरतो.