काही वर्षांपूर्वी आयुष्यमान खुरानाचा सिनेमा विकी डोनर खूप चर्चेत आला होता. या सिनेमात आयुष्यमान खुरानानं अशा युवकाची भूमिका साकारली आहे. ज्याने स्पर्म विकून मोठी कमाई केली. त्याच्या स्पर्म डोनेशनवर त्याची पत्नी नाराज होती परंतु जेव्हा तिला कळालं तिच्या पतीमुळे अनेक कपल्सचं आईबाप होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तेव्हा पत्नीलाही आनंद झाला.
तुम्हाला माहितीये, तुम्हीही स्पर्म डोनर बनून विकी डोनरसारखं अनेक कुटुंबाच्या जीवनात आनंद भरु शकता. त्याचसोबत यातून पैसेही कमवता येतील. द सनच्या रिपोर्टनुसार, धावत्या युगात बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे जगातील लाखो दाम्पत्यांना पालक बनण्यासाठी अनेक अडचणी येतात. या कपल्सना आयवीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पालक बनण्याचा एक पर्याय आहे. त्यासाठी स्पर्म डोनरची आवश्यकता भासते. स्पर्मची जितकी मागणी होते त्यापेक्षा पुरवठा खूप कमी आहे. त्यामुळे स्पर्म डोनेट करुन तुम्ही चांगली कमाई करु शकता. IVF तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फर्टिलिटी ट्रिटमेंटसाठी स्पर्म डोनेशन गरजेचे असते.
जर तुम्ही स्पर्म दान करत असाल तर कुठल्याही फर्टिलिटी क्लीनीक अथवा स्पर्म बँकमध्ये डोनेट करु शकता. तुमच्या सीमेनपासून जन्माला आलेल्या बाळावर ना तुमचा अधिकार असेल ना त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. एप्रिल २००५ मध्ये स्पर्म डोनेटच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळाला १६ वर्षानंतर स्पर्म डोनरबाबत माहिती मागण्याचा अधिकार आहे. ब्रिटनमध्ये स्पर्म डोनेट केल्यानंतर पैसे मागण्यावर निर्बंध आहेत. परंतु स्पर्म डोनेशन काळात खर्च केलेल्या पैशासाठी डोनरला पैसे दिले जातात. स्पर्म डोनेशनसाठी क्लिनीक जाण्यावेळी प्रत्येक भेटीला ३५ पाऊंड देतात. डोनरचा हा अधिकारही आहे. स्पर्म बँक, फर्टिलिटी सेंटर स्पर्म देण्याच्या बदल्यात घर, प्रवास, अन्य खर्चही मागू शकतो.
कोण करु शकतं स्पर्म डोनेट?
स्पर्म डोनरचं वय १८ ते ४१ वर्ष हवं.
डोनर कुठल्याही मेडिकल चाचणीसाठी तयार हवा.
स्पर्म डोनरला कुठलेही शारिरीक अथवा सेक्सुअर ट्रांसमिटिड डिजीज नको.
कुटुंबाची मेडिकल हिस्ट्री देण्यासाठी सहमती हवी.
कुठल्याही ड्रग्सचा वापर नको.
स्पर्म डोनेटपासून जन्मलेल्या मुलाला १८ वर्षानंतर त्याची ओळख सांगण्याची परवानगी हवी
स्पर्ममध्ये हाय क्वालिटी, संख्या आणि आकार चांगले हवे
आपल्या आवडीचा स्पर्म डोनर निवडू शकता
रिपोर्टनुसार, कायदेशीर रित्या स्पर्म डोनरचा फोटो अथवा प्रोफाईल उघड करता येत नाही. परंतु त्याचं वैशिष्टं, उंची, डोळ्यांचा रंग, केसाचा रंग, शरीराचा रंग, बिझनेस, धर्म आणि शिक्षणाबद्दल माहिती मिळू शकते. त्यानंतर स्पर्म बँक मॅनेजर तुमच्या गरजेनुसार, डोनरचा प्रोफाईल शोधेल. त्या डोनरशी संपर्क साधून त्याच्याकडून स्पर्म घेतले जाईल. मेडिकल चाचणीनंतरच स्पर्म कपलला दिलं जातं.