अमेरिकेच्या मेरीलॅंड विश्वविद्यालयातील अभ्यासकांनी मलेरिया रोखण्यासाठी नवा उपाय शोधून काढला आहे. या उपायाच्या माध्यमातून ४५ दिवसांमध्ये डासांना ९९ टक्के नष्ट केलं जाऊ शकतं. आफ्रिकेच्या बुर्किना फासोमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला. अभ्यासकांनी कोळीच्या विषापासून मेथारिझियम पिंग्सहेंस फंगस तयार केलं आहे. याच्या संपर्कात येताच डास मारले जातात. याने मलेरिया रोखण्यास मदत मिळू शकते.
१५०० डासांवर प्रयोग, १३ वाचले
प्रयोगासाठी रिसर्च टीमने बुर्किना फासोमध्ये ६५०० वर्ग फूट क्षेत्राची निवड केली होती. हे मच्छरदानीच्या आत १५०० डासांसोबत फंगसयुक्त कापड ठेवला गेला होता. ४५ दिवसांनंतर १३ डास सोडून सर्व डासांचा मृत्यू झाला होता. या प्रयोगातून फंगसच्या माध्यमातून डासांच्या दोन पिढ्या संपवण्यात मदत मिळाली.
मलेरियाने लाखो लोक होतात प्रभावित
मेरीलॅंड यूनिव्हर्सिटीची रिसर्च टीम आणि बुर्किना फासोच्या आयआरएसएस अनुसंधान संस्थेने या रिसर्चवर काम केलं. अभ्यासकांनी सांगितले की, मादा एनोफिलिस मलेरियाची वाहक असते. हा डास चावल्याने दरवर्षी ४ लाख लोकांचा मृत्यू होतो. दरवर्षी जगभरातील साधारणपणे २१९ कोटी लोकांना मलेरिया हा आजार होतो.
ऑस्ट्रेलियात कोळीतून काढलं विष
(Image Credit : The Australian)
मेरीलॅंड विश्वविद्यालयाचे प्राध्यापक रेमंड सेंट लेगर यांनी सांगितले की, फंगस तयार करण्यासाठी आम्ही जेनेटि इंजिनिअरींगचा वापर केला. यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारी फनल वेब कोळीच्या विषाचा वापर केला गेला. फंगस डासांमध्ये पोहोताच विष काम करू लागतं आणि डासांची संख्या कमी होऊ लागते.
जगभरात वापराची तयारी
प्रा. लेगर सांगतात की, कोळी कोणत्याही किड्यांना मारण्यासाठी त्यात विष सोडते. आम्ही हीच टेक्निक वापरली. लॅबमध्ये झालेल्या परीक्षणावरून हे दिसतं की, फंगस वेगाने डास मारतं. आता जगातल्या वेगवेगळ्या भागात याचं परीक्षण केलं जाणार आहे. मेरीलॅंड यूनिव्हर्सिटीचे डॉ. ब्रायन लोवेट यांनी सांगितले की, आमचा उद्देश डासांची प्रजाती नष्ट करणे हा नसून मलेरिया रोखणे हा आहे.