कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरात कहर केला आहे. कोरोनाची लस कधी येणार याच्या प्रतिक्षेत संपूर्ण जगभरातील लोक आहेत. दरम्यान रशियन लस स्पुटनिक व्ही बाबत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. रशियाची स्पुतनिक व्हि लस कोरोनापासून बचावासाठी ९२ टक्के परिणामकारक ठरल्याचं या देशाने सांगितलं आहे. रशियाची पहिली लस Sputnik V एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. या लशीच्या चाचणीचे अंतरिम निकाल हाती आले असल्याचं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेनं सांगितलं आहे.
याच संस्थेतर्फे कोरोना लशीचं जगभरात सध्या विपणन सुरू आहे. रशियाने Sputnik V ची चाचणी १६०० लोकांवर केली होती. या लोकांना लशीचे दोन दोन डोस देण्यात आले होते. या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे.
"रशियन वृत्तसंस्था TASS च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही. रशियन वृत्तसंस्था TASS च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही. या लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच लस सर्वसामान्यांना देण्याची सुरूवात करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह इतर तज्ज्ञांनी या लसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे 4 लाख 94 हजार 657 रुग्ण सक्रिय आहेत. तर या आजारापासून बरे होणाऱ्यांची संख्या 80 लाख 13 हजार 783 आहे. देशात आतापर्यंत एकूण 86 लाख 36 हजार 012 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 44, 281 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे, तर 512 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 17,23,135 इतकी आहे. तर 3,277 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15,777, 322 झाली आहे आणि आतापर्यंत एकूण 46,249 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 'या' देशात ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे ३ कोटी डोस तयार; जाणून घ्या सर्वसामान्यांना कधी मिळणार