रशियाकडून विकसित करण्यात आलेली स्पूतनिक वी ही लस चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार हे परिक्षण मॉस्कोतील ई राज्य संचालित वैद्यकिय संस्थानांमध्ये केलं जाणार आहे. हे ट्रायल एकूण मिळून ४० स्वयंसेवकांवर केलं जाणार आहे. यात भाग घेणारे सगळेच लोक १८ वर्षापेक्षावरिल वयोगटाचे असणार आहेत. गमलेया इंस्टिट्यूटनं ही लस विकसीत केली आहे. या लसीचे रजिस्ट्रेशन ११ ऑगस्टला करण्यात आलं होतं.
गमलेया रिसर्च सेंटरचे निर्देशक अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये १५ ते २० तारखेदरम्यान देशात लसीकरणाची सुरूवात केली जाणार आहे. माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार या लसीची दोन भागात विभागणी केली जाणार आहे. साधारणपणे १५ ते २० सप्टेंबरपर्यंत चाचणी पूर्ण होऊ शकते. रशियाच्या (आरडीआईएफ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रेव यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पुतनिक वी ही लस शेवटच्या टप्प्यातील चाचणीत आहे. ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन तज्ज्ञांनी केला आहे.
अनेक देशांनी या लसीबाबत संशय व्यक्त केला आहे. अनेक देशांकडून या लसीची मागणी केली जात आहे. वेगवेगळ्या देशांना लस पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाण्याची शक्यता आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात ही लस निर्मित होऊ शकते. त्यासाठी भारताच्या औषधी निर्मीती करत असलेल्या कंपन्यांशी संपर्क केला जाऊ शकतो.
रशियानं कोरोनाची दुसरी लसही तयार केली आहे. या लसीला एपीवॅककोरोना असं नाव देण्यात आलं आहे. या लसीला रशियाच्या वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजीनं विकसित केलं आहे. ही लस स्पूतनिक वी लसीपेक्षा अधिक प्रभावी आहे. या लसीची चाचणी सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार असून ऑक्टोबरला रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. नोव्हेंबरपासून या लसीचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.
‘कोव्हिशिल्ड’च्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादित करण्यात येत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस बुधवारी भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये सुरुवात झाली. दोन स्वयंसेवकांना प्राथमिक वैद्यकीय चाचण्या करून लसीचा अर्धा मिलिलीटर डोस देण्यात आला. दोन्ही स्वयंसेवक पुरुष असून त्यांची वये अनुक्रमे ३२ आणि ४७ वर्ष आहेत.
दोन्ही स्वयंसेवकांना २८ दिवसांनी (सप्टेंबर महिन्यात) दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस दिल्यापासून ५७व्या दिवशी (आॅक्टोबर महिन्यात) तपासणीसाठी बोलावले जाईल. ९० दिवसांनी (नोव्हेंबर महिन्यात) त्यांच्यामध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडी तयार झाल्या आहेत का, आरोग्याच्या इतर तक्रारी हे पाहिले जाईल. १८० दिवसांनी (फेब्रुवारी महिन्यात) त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावले जाऊन लसीची यशस्विता तपासली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. यावेळी डॉ. अस्मिता जगताप, डॉ. सोनाली पालकर, डॉ. जितेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.
येत्या सात दिवसात २५ स्वयंसेवकांना लस देण्यात येईल. देशभरात शंभर जणांना ही लस देण्यात येणार आहे. यासाठी १८ वर्षांवरील निरोगी स्त्री-पुरुषांची निवड करण्यात येणार आहे. स्वयंसेवक निवडताना प्रथमत: त्यांची आरटीपीसीआर आणि अॅँटिबॉडी तपासणी करण्यात येणार आहे.
हे पण वाचा-
खुशखबर! नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी; कितपत सुरक्षित ठरणार? जाणून घ्या
देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा