शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

खुशखबर! २०२०-२१ मध्ये १०० कोटी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचणार; रशियाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 9:41 AM

जगातली पहिली वॅक्सिन स्पुतनिक व्ही लस पहिली टप्प्यातील  लसीकरणात नागरिकांना लस दिली जाणार आहे.

संपूर्ण जगभरातील लोक कोरोना लसीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. रशियाात कोरोना लसीचे डोज नागरिकांना देण्यास सुरूवात झाली आहे. जगातली पहिली वॅक्सिन स्पुतनिक व्ही लस पहिली टप्प्यातील  लसीकरणात नागरिकांना लस दिली जाणार आहे. एका रिपोर्टनुसार रशियानं घोषणा केली आहे की २०२०-२१ मध्ये एक बिलियन म्हणजेच १०० कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं इंटरफॅक्सवृत्त संस्थेच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. या लसीबाबत अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

रशियातील आरडीआयएफनं ब्राजीलसह इतर देशांमध्ये लसीच्या निर्यात करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या व्यतिरिक्त कजाकिस्तानसोबतही  करार करण्यात आला आहे.  सुरुवातीला २० लाखपेक्षा अधिक लसीचे खुराक खरेदी करण्यासाठी तयार असून नंतर  ५० लाख डोज मागवण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार भारतात रशियन लसीचे ३० कोटी डोज उत्पादित केले जाणार आहेत. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजूनही पूर्ण झालेली नाही. या महिन्यात या लसीची चाचणी भारतात होणार आहे. रशियनन डायरेक्टर इनवेस्टमेंट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रिव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतासह संयुक्त अरब, सौदी अरब, फिलीपींस आणि ब्राजिलमध्ये या महिन्यापासून चाचणीला सुरूवात होणार आहे. 

ब्लादिमीर पुतिन यांनी ११ ऑगस्टला स्पुतनिक व्ही ही लस लॉन्च केली  होती. याशिवाय या लसीच्या परिणामकारकतेबाबतही सांगण्यात आले होते. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असून त्यांनी आपल्या मुलीलाही ही लस दिल्याचा दावा केला होता. ही लस मॉस्कोतील गमलेया रिसर्च इंन्स्टिट्यूटनं विकसित केली आहे. वैद्यकिय नियतकालिक लेसेंटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार सुरूवातीच्या ट्रायल दरम्यान ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. ही लस घेतल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार झाल्या आल्या.

IMAचं ठरलं! आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचार

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवरच्या उपचाराचे दर शासनाने निश्चित केले आहेत. एका दिवसात एका पेशंटला जास्तीत जास्त 15 हजार रुपये उपचारासाठी मोजावे लागतील. कोणतेही रुग्णालय निश्चित दरापेक्षा रुग्णांकडून अधिक शुल्क आकारू शकणार नाही.दिवसाला फक्त 15 हजार रुपये रुग्णांना द्यावे लागणार 

यापूर्वी सरकारने दोन श्रेणीतील रुग्णांची फी दररोज आठ आणि 13 हजार रुपये निश्चित केली होती. ठिकठिकाणी फीपेक्षा जास्त पैसे घेतल्याच्या बर्‍याच ठिकाणी तक्रारी आल्या. आता सरकारने शुल्क तीन श्रेणींमध्ये निश्चित केले आहे. 15 हजार रुपये जास्तीत जास्त आहे. ज्यांची तब्येत कमी खराब आहे आणि त्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी दिवसातून आठ आणि 13 हजार रुपये दर निश्चित केले गेले आहेत. या दरात बीपी आणि शुगरवरही उपचार केले जातील. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने दर निश्चित केले असून, खासगी रुग्णालयांना आता ठरविलेल्या शुल्कावर रुग्णावर उपचार करावे लागणार आहेत.रुग्णांनाही ही सुविधा मिळणार

पॅनेसियाचे डॉक्टर अजय शुक्ला म्हणाले की, लक्षणे नसलेल्या आठ हजार रुग्णांकडून सरकारने ठरविलेले दर घेतले जातील. त्यांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची सुविधा पुरविली जाईल. आयसीयू सुविधा रुग्णांना 13 हजार रुपयांना देण्यात येणार आहे. 15 हजार रुपयांना आयसीयूसह  व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. या दरामध्ये रुग्णांना जेवण, काही आवश्यक चाचण्या, औषध, नर्सिंग शुल्काचा समावेश असेल. सीएमओ डॉ. श्रीकांत तिवारी म्हणाले की, खासगी रुग्णालय कोरोना रुग्णांवर शासनाने निश्चित केलेल्या दराने उपचार करेल. त्यापेक्षा जास्त रुग्णांना पैसे द्यावे लागणार नाहीत.इंजेक्शनसाठी स्वतंत्र पैसे द्यावे लागतील

शासनाने काही इंजेक्शन्स रुग्णांना देण्याचे दर निश्चित केले आहे, अशी माहिती डॉ. अजय शुक्ला यांनी दिली. त्यामध्ये रेमिडेसिव्हर आणि टोकलिझुमब यांचा समावेश आहे. हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार रुग्णांना दिले जाईल. परंतु यासाठी त्यांना स्वतंत्र पैसे मोजावे लागतील. सरकारने ही इंजेक्शन पॅकेजमध्ये जोडलेली नाहीत. एखादा रुग्ण किडनीसह गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर आयुष्मान योजनेतील लाभार्थ्यांना ठरलेल्या दराने त्याच्यावर उपचार केले जातील. त्यांच्याकडून जादा शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय कोरोना रुग्ण आयुष्मान योजनेस पात्र ठरल्यास त्यातून अधिक शुल्क घेतले जाणार नाही.

हे पण वाचा-

CoronaVirus News: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू; जाणून घ्या कधी लॉन्च होणार

CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा 

CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य