शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

फ्लॉप चित्रपटांमुळे त्रस्त झालेत स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:12 AM

या शुक्रवारी प्रदर्शित होणार्‍या तमाशा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही ज...

 तमाशा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी लोकमतच्या मुंबई कार्यालयात आली होती. यावेळी रणबीरला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे तो थोडा उदास झाला. तुझे मागील तीन प्रदर्शित चित्रपट बॉक्स ऑफिसवर का चालले नाही, असा हा प्रश्न होता. यावर रणबीर म्हणाला, मागील तीन चित्रपट अपयशी ठरले हे खरे आहे. म्हणूनच तमाशा चित्रपटाबाबत मला थोडा प्रेशर जाणवत आहे. रणबीर कपूरचा हा दबाव विनाकारण नाही.जेव्हा सलग तीन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप झाले तर मोठमोठय़ा स्टार मंडळींना असे टेंशन येतेच. तसे पाहता रणबीर कपूरच्या कॅरिअरची सुरुवातच फ्लॉप चित्रपटाने झाली होती. शाहरुख खानच्या ओम शांती ओमच्या स्पर्धेवेळी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरचा पहिला चित्रपट सांवरियाने बॉक्स ऑफिसवर 'पाणीही मागितले नव्हते' आणि ओम शांती ओम सोबत हा सामना एकतर्फी झाला होता.बॉलिवूडचा इतिहास सांगतो की, जवळपास सर्वच मोठय़ा स्टार मंडळींनी सलग फ्लॉप चित्रपटांचा काळ सहन केला आणि नंतर ते यशाच्या मार्गावर परतले. जास्त दूर न जाता सध्याच्या स्टारलाच पाहिले तर ही गोष्ट लक्षात येते. रणबीर कपूर प्रमाणे शाहिद कपूरदेखील मोठय़ा काळापासून फ्लॉप चित्रपटांचा मार सहन करीत आहे. जब वी मीटच्या यशानंतर शाहिद फ्लॉप-हिट चित्रपटांमध्ये गुंतला आहे. मौसम, आर. राजकुमार, फटा पोस्टर निकला हीरो आणि हैदर नंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शानदारच्या अपयशाने जसे त्यांची कंबरच तोडली आहे.हृतिक रोशनने देखील फ्लॉप चित्रपटांचा मोठा काळ पाहिला आहे. कहो न प्यार है नंतर हृतिक रोशनचे कॅरिअर फ्लॉप चित्रपटांच्या संकटांनी वेढले गेले. यादें, आप मुझे अच्छे लगने लगे, मैं प्रेम की दीवानी, मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटांमुळे त्याच्या कॅरिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. भले हो त्याचे वडील राकेश रोशनचे, ज्यांनी प्रथम कोई मिल गया आणि नंतर क्रिशच्या मालिकेद्वारे आपल्या मुलाला या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळविले. यामध्ये सलमान खानचे उदाहरणदेखील दिले जाऊ शकते.