(Image Credit: hopphat.com)
मुंबई : गरमी असो वा नसो काही लोकांना एसीची सवयच झालेली असते. घर, ऑफिस आणि कार सगळीकडेच त्यांना एसी हवा असतो. पण ही सवय तुम्हाला अनेक आजारांच्या दारात नेऊन ठेवू शकते. उन्हाळ्यात एसीशिवाय राहणं शक्य तर नाही पण त्याचा वापर कमी केला जाऊ शकतो. नाहीतर तुम्हाला खालील गोष्टींच्या समस्या अधिक भेडसावू शकतात.
ताज्या हवेचा अभाव
24 तास एसीमध्ये राहिल्याने तुम्हाला ताजी स्वच्छ हवा मिळत नाही. कारण एसी सुरु करण्यापूर्वी खिडक्या आणि दारं बंद केले जातात. या रुममध्ये हवा तेवढ्याच परीसरात बंद होते. ताजी हवा न मिळणे तुमच्या शरीराच्या विकासात अडथळा निर्माण करु शकते.
हाडांची समस्या
एसीमध्ये झोपल्याने रुममध्ये तापमान खूप होतं. अशात शरीरही खूप थंड होतं आणि आपल्याला याचा अंदाजही होत नाही. याच थंडीमुळे हाडांची समस्या तुम्हाला भेडसावू शकते. हीच समस्या पुढे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देते.
त्वचेवर सुरकुत्या
एसी ऑन केल्यानंतर थंडीमुळे तुमचा घास कोरडा होतो. पण एसी रुमसोबतच तुमच्या शरीरातील ओलावा कमी होतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. याकारणाने त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात. त्यासोबतच शरीरात पाणी कमी झाल्यास वेगवेगळे आजारही होऊ शकतात.
गरमीचा त्रास
ज्या लोकांना एसीची सवय झालेली असते त्यांची गरमीची सहनशीलता खूप कमी होते. त्यांना उन्हात जास्त राहणे कठिण होऊन बसतं. ते जराही सूर्यकिरण सोसू शकत नाहीत. हे खासकरुन अधिक गरमीच्या ठिकाणी जास्त त्रासदायक ठरतं.