जगात ४० कोटीहून अधिक लोक मधुमेह या आजाराने ग्रासलेले आहेत. मधुमेहामुळे किडनी फेल, हार्ट अटॅक, आंधळेपणा यांसारख्या समस्या ही येत आहेत. मात्र आता एका संशोधनानुसार मधुमेह इतक्या वेगाने पसरण्याचे कारण समोर आले आहे. या संशोधनात गल्लीबोळा, रस्त्यांवर जे लाईट लावलेले असतात त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते असे म्हणले आहे.
लाईटच्या खाली थांबल्याने मधुमेह वाढतो
चीनच्या एका विद्यापिठातील संशोधकांनी डायबिटीज आणि लाईट यांच्यातील संबंध शोधून काढला आहे. याला Diabetologia डायबेटिलोजिया जर्नल वर प्रकाशित केले गेले. या संशोधनात असे नमुद केले आहे की, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या लाईट्समुळे डायबिटिजचा धोका वाढतो. LAN लाईट्स मुळे प्रदुषण वाढते. याचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर होतो. या लाईटमुळे ब्लड शुगरला नियंत्रित करणारे इंसुलिन आणि ग्लुकोजन हार्मोनला डिस्टर्ब करतात. परिणामी रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि मधुमेह होतो.
काही चुकांमुळे डायबिटिस आणखीनच गंभीर होतो. यासाठी रुग्णांनी वेळोवेळी शुगर लेव्हल तपासली पाहिजे. नाहीतर शुगर लेव्हल कंट्रोलच्या बाहेर जाते. तपासणीतुन वेळोवेळी हे निष्पन्न होते की डायबिटिस खरेच कंट्रोल मध्ये आहे का.
मधुमेह झाला तर शरीर आपल्याला संकेत देत असते. या लक्षणांचे निरीक्षण केले पाहिजे. रात्री सतत बाथरुमला जावे लागते, किंवा सतत तहान लागते तर हे मधुमेहाचे लक्षण आहे.