व्यस्त जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. शारीरिक हालचाली न करणे, जास्त प्रमाणात खाणे या कारणामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते. मात्र, आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. चला तर ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात.
कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढणेतणावामुळे आपले वजन वाढते. जेव्हा आपण तणावात असतो, तेंव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे आपल्या रक्तातील ग्लूकोज बाहेर पडते. यामुळे तुमचे वजन वाढते. तणावामुळे, आपल्याला पुरेशी झोप येत नाही जे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढवण्याचे मुख्य कारण आहे. तसेच यामुळे तुम्हाला जास्त भूक देखील लागते आणि अन हेल्दी अन्न खाण्याची इच्छा होते. तणावामुळे आपण आपल्या डोळ्यांसमोर असलेली प्रत्येक गोष्ट खातो. विशेषतः सहजपणे उपलब्ध असलेल्या अशा गोष्टी खायला आवडतात. फास्ट फूड हा आपला आवडता आहार बनतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे आपण अती ईमोशलन होतो, ज्यामुळे आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त आहार घेतो.
तणावामुळे वाढलेले वजन कमी करण्यावर उपायवजन कमी करताना भूकेले राहवे असे बिलकुलच नाही. तर आपल्या आहारात पौष्टिक आहार घ्या. अन्नावर प्रक्रिया केलेल्या गोष्टीऐवजी निरोगी गोष्टी खा. यामुळे आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.पाणी हा उर्जाचा मुख्य स्रोत आहे. हे तुमची पाचक प्रणाली मजबूत करते तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. पाणी तुमची भूक शमवते, तसेच शरीर हायड्रेट ठेवते.ताणतणावादरम्यान व्यायाम करणे हा उत्तम उपाय आहे. तु्म्ही तणाव कमी करण्यासाठी योगासनेही करू शकता.आपल्या आवडीचे छंद जोपासणे, आपल्या आवडीच्या व जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा.