Stroke Sign : स्ट्रोक (Stroke) ला कधी कधी ब्रेन अटॅकही म्हटलं जातं. हा तेव्हा येतो, जेव्हा ब्रेनमध्ये आवश्यकतेनुसार रक्त पुरवठा होत नाही. किंवा ब्रेनमध्ये रक्ताच्या नसा फाटतात. याने पीडित व्यक्तीवर जर योग्यपणे उपचार केले गेले नाही तर ती व्यक्ती बराच काळ दिव्यांग होण्यापासून ते त्याचा मृत्यू होण्याचा धोकाही असतो.
जास्तीत जास्त लोकांना स्ट्रोक येण्याच्या काही दिवसांआधी डोकेदुखी, शरीराच्या काही अवयवांमध्ये झिणझिण्या किंवा सुन्न होणे असे अनुभव येतात. पण याकडे लोक सामान्यपणे गंभीरतेने बघत नाहीत.
एका स्टडीनुसार, स्ट्रोक जगभरात दुसरा आणि भारतात होणाऱ्या मृत्यूचं आणि दिव्यांग होण्याचं 5 वं सगळ्यात मोठं कारण आहे. अशात नुकत्याच करण्यात आलेल्या स्टडीचे निष्कर्ष तुम्हाला यातून वाचवू शकतात.
अचानक स्ट्रोक येत असला तरी स्ट्रोक येण्याच्या एक आठवडाआधी काही लक्षणे दिसतात. याचा दावा जवळपास अर्ध्या स्ट्रोकच्या रूग्णांनी केला आहे. एका स्टडीनुसार, स्ट्रोकच्या 43 टक्के रूग्णांना एक मोठा स्ट्रोक येण्याच्या एक आठवडाआधी मिनी स्ट्रोकच्या लक्षणांचा अनुभव आला.
काय आहे मिनी स्ट्रोक
मायो क्लीनिकनुसार, मिनी स्ट्रोकला ट्रांसिएंट इस्केमिक अटॅक असंही म्हणतात. हा काही काळासाठी दिसणाऱ्या स्ट्रोकचा संकेत आहे. एक मिनी स्ट्रोक ब्रेनमध्ये रक्ताचा पुरवठा थोडा वेळ थांबल्याचा परिणाम असतो. एक TIA सामान्यपणे काही मिनिटेच राहतो.
मिनी स्ट्रोकची लक्षणे
NHS नुसार, स्ट्रोक प्रमाणेच मिनी स्ट्रोकची लक्षण सामान्यपणे अचानक दिसू लागतात. जे खालील प्रमाणे आहेत.
- चेहरा किंवा शरीरात एका बाजूला पॅरालिलिस
- स्पष्ट बोलण्यात अडचण
- अंधारी येणे
- डबल व्हिजन
- बॅलन्स बिघडणे किंवा चालण्यात अडचण
- हात सुन्न होणे
- समजण्यात अडचण
- चक्कर येणे
मिनी स्ट्रोकसाठी रिस्क फॅक्टर
क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, स्ट्रोकची फॅमिली हिस्ट्री, 55 पेक्षा जास्त वय, हाय बीपी, फिजिकल अॅक्टिविटीची कमतरता, डायबिटीस, हार्ट डिजीज, स्मोकिंग, लठ्ठपणासारख्या समस्या स्ट्रोकचा धोका वाढवतात.
कसा कराल बचाव
निरोगी जीवनासाठी संतुलित जीवनशैली असणं फार गरजेचं असतं. अशात स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी धूम्रपान सोडा, नियमित एक्सरसाइज करा, हिरव्या भाज्या आणि फळांची बॅलन्स डाएट, योग्य वजन यावर लक्ष दिलं पाहिजे.