How To Reduce Cholesterol: हार्ट डिजीजमुळे जगभरात लोक शेकडो लोकांचा जीव जातो. हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि सूज यांसारख्या समस्यांमुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. NCBI मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, तुमच्या किचनमध्ये असलेला लसूण कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करून तुम्हाला हार्ट डिजीजपासून वाचवू शकतो.
रिसर्चमधून समोर आलं की, लसणासोबत लिंबाचं सेवन केलं तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळू शकते. लसणातील इम्यून बूस्टिंग, एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्सीडेंट गुणांमुळे याचे हृदयाला फायदे मिळतात. कोलेस्ट्रॉल एक चिकट पदार्थ असतो जो आपल्या नसांमध्ये जमा होतो. याचं प्रमाण वाढलं तर ब्लड फ्लो कमी होतो आणि तुम्हाला हार्ट डिजीज, स्ट्रोक, हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
लसूण आणि लिंबात आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद
अभ्यासकांनी सांगितलं की, लसणामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते. लसूण आणि लिंबाच्या रसाचं सोबत सेवन केलं तर हाइपरलिपिडिमियाच्या रूग्णांच्या लिपिड लेवल, फाइब्रिनोजेन आणि ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा होते. रिसर्चमधून समोर आलं की, दररोज लसणाची अर्धी किवा एक कळी खाल्ली तर कोलेस्ट्रॉल लेव्हल जवळपास 10 टक्के कमी होतं.
लसणाने हृदय कसं निरोगी राहतं
लसूण आपल्या बायोअॅक्टिव गूण एलिसिन आणि इतर घटक जसे की, डायलिल डायसल्फाइड आणि एस-एलसिस्सीस्टीनमुळे शक्तीशाली जडीबुटी आहे. अभ्यासक असं मानतात की, लसणातील पोषक तत्व हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात.
अॅंटी-ऑक्सिडेंटचा खजिना लसूण-लिंबू
यात व्हिटॅमिन सी असतं जे एक शक्तीशाली अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. याने हृदयाचं फ्री रॅंडिकलपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. व्हिटॅमिन बी6 हेल्दी रेड सेल्स वाढवण्यास मदत करतं आणि हार्ट डिजीजचा धोकाही कमी होतो.
कसं करावं लसणाचं सेवन
लसणाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं. तुम्ही लसणाचं सेवन कोणत्याही रूपात करा. याने कोलेस्ट्रॉल आणि कमी घनत्व असलेले लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. अभ्यासकांनी लसूण आणि लिंबाचं सोबत सेवन करण्यास सांगितलं.