कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर करणं तसंच सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं महत्वाचं आहे. सगळ्यात प्रभावी उपायांमध्ये या उपायांचा समावेश होतो. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून असं दिसून आलं की, खोकताना किंवा शिंकताना बाहेर येत असलेले ड्रॉपलेट्स २५ फुटांपर्यंत दूर जाऊ शकतात.
यातून सुक्ष्म कणही बाहेर निघतात. हे संशोधन आयटीआय भुवनेश्वरच्या संशोधकांकडून करण्यात आलं होतं. या संशोधनातून देण्यात आलेल्या माहितीनुसार मास्क, फेसशिल्डसारख्या उपायांमुळे संसर्गाचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. पण सुक्ष्म कणांची गळती रोखता येऊ शकतं नाही. त्यासाठी दोन फुटांपर्यंत सोशल डिस्टेंसिंग पाळणं महत्वाचं आहे.
आईआईटी भुवनेश्वरद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार मास्क आणि फेसशिल्ड लावल्यानंतरही शिंकताना नाकाला हात किंवा कोपराने झाकून घ्या. जेणेकरून अतिसुक्ष्म कण बाहेर पडण्यापासून रोखता येईल. कोरोना व्हायरसला रोखणं हे मोठं आव्हान बनलं आहे. यात मास्कच्या प्रभावावर अभ्यास करण्यात आला होता.
स्कूल ऑफ मॅकॅनिकल साइंसचे प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर वेणूगोपाल अरूमुरू आणि त्यांच्या टीमकडून हे संशोधन करण्यात आला होतं. मास्क किंवा फेसशिल्ड न लावता शिंकल्यास लहान लहान थेंब सामान्य वातावरणात २५ मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार संक्रमणापासून वाचण्यासाठी सहा ते सात फुटांचे अंतर ठेवणं गरजेचं आहे.
Coronavirus: दिलासादायक! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, तीन दिवसांत नवे रुग्ण अर्ध्यावर
आयआयटी भुवनेश्वरचे संचालक प्राध्यापक आर. व्ही. राजा कुमार म्हणाले की, ''कोविड -१९ साथीच्या काळात संस्थेचे शिक्षक आणि विद्यार्थी अथ्थक परिश्रम घेत आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्याबरोबरच नवीन विषयांचा अभ्यास करत आहेत. सध्या सोशल डिस्टेंसिंगच्या विषयावर अभ्यास केल्याबद्दल टीमचे अभिनंदन करताना प्राध्यापक कुमार म्हणाले की अजूनही संशोधन सुरू राहणार आहे.''
coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान
पुढे त्यांनी सांगितले की, ''सर्वांनाच माहिती आहे की शिंकताना, खोकताना आणि बोलताना तोंड व नाकातून पाण्याचे सूक्ष्म थेंब वातावरणात पसरतात. मास्क, फेस शिल्डचा वापर सुरू असतानाही कशाप्रकारे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. म्हणून योग्य सोशल डिस्टेंसिंग पाळणं महत्वाचं आहे, हे या अभ्यासातून दिसून येतं.''