रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही फोन पाहत असाल तर ही सवय लवकर बदला. दोन वर्षे चाललेल्या एका रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, झोपण्यापूर्वी फोन पाहणं खूप नुकसान करू शकतं. सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने होणारं नुकसान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच सहन करावं लागतं. झोपण्यापूर्वी फोन पाहण्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया.
JAMA जर्नलमध्ये एक रिसर्च प्रकाशित झाला आहे. जवळपास २ वर्षे चाललेल्या या रिसर्चमध्ये १.२२ लाख लोकांनी भाग घेतला. रिसर्चमध्ये झोपण्यापूर्वी लोकांच्या फोन वापराच्या पद्धतीचं निरीक्षण करण्यात आलं. यामध्ये असं दिसून आलं आहे की, जे लोक झोपण्यापूर्वी फोन पाहतात त्यांची झोपेची गुणवत्ता इतरांपेक्षा ३३ टक्के कमी असते. याचा अर्थ असा की फोनकडे पाहिल्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
झोपण्यापूर्वी फोन आणि इतर स्क्रीन डिव्हाइसेसकडे पाहण्याचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होतो, असंही रिसर्चमधून समोर आलं आहे. झोपण्यापूर्वी फोन पाहणं आणि त्याचा झोपेवर होणारा परिणाम यावर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिसर्स आहे. यामध्ये फक्त झोपेच्या वेळेवर होणारा परिणाम पाहण्यात आला नाही तर झोपेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम देखील तपासण्यात आला आहे.
रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, फोनकडे पाहण्याचा परिणाम आठवड्याच्या शेवटच्या दिवसांपेक्षा आठवड्याच्या दिवसात झोपेच्या सरासरी वेळेवर जास्त होतो. याचा अर्थ असा की कमी झोपेचा तुमच्या कामावर परिणाम होईल आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊ शकते. फोनकडे पाहिल्यामुळे लोक दर आठवड्याला सरासरी ५० मिनिटं कमी झोपत आहेत.