लोक त्यांची ब्लड शुगर लेव्हल त्यांची खाण्याची आणि एक्सरसाइजची वेळ बदलूनही चांगली ठेवू शकतात. याचा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. या रिसर्चनुसार, असं केल्याने डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील आणि शरीराचं वजनही कमी होईल.
यूकेतील बाथ युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, नाश्त्यानंतर एक्सरसाइज करणाऱ्या लोकांपेक्षा ते लोक दुप्पट प्रमाणात फॅट बर्न करतात, जे ब्रेकफास्टआधी एक्सरसाइज करतात. या रिसर्चचे निष्कर्ष Journal of Clinical Endocrinology & Metabolism मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. अभ्यासकांनी ६ आठवडे रिसर्च केला. ज्यात ३० पुरूषांचा समावेश होता. जे लठ्ठपणाचे शिकार होते किंवा ओव्हरवेट होते.
निष्कर्षांची तुलना दोन गटात करण्यात आली. एक ज्यात लोकांनी एक्सरसाइजआधी ब्रेकफास्ट केला आणि दुसरा ज्यात लोकांनी एक्सरसाइजनंतर ब्रेकफास्ट केला. अभ्यासकांनुसार, ज्या लोकांनी ब्रेकफास्ट करण्याआधी एक्सरसाइज केली त्यांच्यातील प्रोटीन वाढलेलं आढळलं.
नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज कधी करावी? असाही एक प्रश्न अनेकांना पडतो. पण या प्रश्नाचं उत्तर अनेकदा लाइफस्टाईलवर अवलंबून असतं. याबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, व्यक्तीला ज्यावेळी एक्सरसाइज करणं चांगलं वाटतं, त्यावेळी त्यांनी एक्सरसाइज करावी. काही लोकांना नाश्ता करण्याआधी एक्सरसाइज करणं जास्त सोपं वाटतं. तर काही लोकांना नाश्त्यानंतर एक्सरसाइजमध्ये जास्त ऊर्जा जाणवते.
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नाश्ता केल्यानंतर एक्सरसाइज करायची असेल तर नाश्ता हलका करायला हवा. नाश्ता केल्यानंतर कमीत कमी एक तास कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करणे टाळावे. नाश्ता केल्यावरही स्वत:ला हायड्रेट करण्याचं काम करा.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्ता आणि एक्सरसाइजची योग्य पद्धत महत्वाची असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक्सरसाइज आणि नाश्त्याची निवड करावी.