(Image Credit : slate.com)
एका स्त्रीसाठी आई होणं हा जगातला सर्वात मोठ्या आनंदापैकी एक मानला जातो. पण अनेक अशीही स्थिती निर्माण होते की, येणारं बाळ हे आईच्या आनंदाचं नाही तर दु:खाचं कारण ठरू शकतं. कदाचित हेच कारण आहे की, बाळ जगात आल्यानंतर होणारे परिणाम लक्षात ठेवून अनेकदा आई होणारी महिलागर्भपातसारखा कठोर निर्णय घेते. आता सगळ्यांनाच असं वाटत असेल की, इतका मोठा निर्णय घेतल्यावर महिलेला पश्चाताप किंवा दु:खं वाटत असेल, पण असं नाहीये.
रिसर्चमधून खुलासा
अभ्यासकांनुसार, अबॉर्शन म्हणजेच गर्भपात केल्यानंतर पाच वर्षांनीही गर्भपात करणाऱ्या महिलांना या निर्णयावर काहीच पश्चाताप होत नाही आणि त्यांना असं वाटतं की, त्यावेळी त्यांनी घेतलेला हा निर्णय बरोबर होता. सोशल सायन्स अॅन्ड मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये याचे काहीच पुरावे मिळाले नाही की, गर्भपात केल्यावर त्यांना पश्चाताप होतो.
दोनप्रकारच्या भावना
रिसर्चमध्ये सहभागी महिलांनुसार, गर्भपातासंबंधी त्यांच्या दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक भावना विसरून जातात. गर्भापत केल्यावर ५ वर्षांबाबत सांगायचं तर साधारण ८४ टक्के महिलांच्या मनात याबाबत एकतर सकारात्मक भावना होती की, त्यांनी जे केलं ते योग्य केलं किंवा त्यांच्या मनात याबाबत काही भावनाच नव्हती.
(Image Credit : evoke.ie)
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील प्राध्यापक आणि रिसर्चचे मुख्य लेखक कोरीन रोक्का यांच्यानुसार, 'जेव्हा गर्भपात करायचा असतो तेव्हा महिलांसाठी निर्णय घेणं कठिण असतं. त्यांना वाटत असतं की, समाज त्यांचा हा निर्णय स्वीकारतील की नाही. पण नंतर जास्तीत जास्त महिलांना हेच वाटत असतं की, त्यांनी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता'.
१ हजार महिलांवर ५ वर्षे अभ्यास
(Image Credit : snopes.com)
या रिसर्चमधून हा दावा खोडून काढला जातो की, गर्भपात केल्यानंतर महिला इमोशनल होतात. या रिसर्चच्या अभ्यासकांनी टर्नअवे नावाच्या दुसऱ्या एका रिसर्चच्या डेटाची तपासणी केली. हा रिसर्च पाच वर्षे चालला आणि यात अमेरिकेतील २१ शहरातील गर्भपात करणाऱ्या १ महिलांचा यात समावेश करण्यात आला होता. यात त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर काय प्रभाव पडतो याची टेस्ट केली गेली.
निर्णय घेणं कठिण पण पश्चाताप नाही
महिलांनी त्यांच्या निर्णयावर नंतर पश्चाताप व्यक्त केला नसता तरी गर्भपाताचा निर्णय घेणं जास्तीत जास्त महिलांसाठी कठिण होता. यातील साधारण २७ टक्के महिलांनी हे मान्य केलं की, गर्भपात करण्याचा निर्णय घेणं त्यांच्यासाठी कठिण होतं. तर ४६ टक्के महिलांनी हे सांगितलं की, गर्भपात करण्याचा निर्णय घेणं त्यांच्यासाठी अजिबात कठिण नव्हता.