आतापर्यंत करण्यात आलेल्या अनेक छोट्या रिसर्चमधून हे सांगण्यात आलं होतं की, सिजेरियन डिलिव्हरीच्या माध्यमातून जन्माला आलेल्या मुला-मुलींमध्ये लठ्ठपणा होण्याचा धोका अधिक राहतो. पण आता नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून सिजेरियन किंवा सी-सेक्शनने जन्माला आलेल्या बाळात नॉर्मल डिलिव्हरीने जन्माला आलेल्या बाळाच्या तुलनेत कोणत्याही प्रकारचा लठ्ठपणा विकसित होत असल्याचं समोर आलेलं नाही. म्हणजेच हे की, सिजेरियनने जन्माला आलेल्या बाळांमध्ये पुढे जाऊन लठ्ठपणा विकसित होत नाही.
सी-सेक्शन आणि लठ्ठपणाचा संबंध नाही
(Image Credit : thehansindia.com)
स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रिसर्चचे निष्कर्ष पीएलओएस मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत. या रिसर्चशी संबंधित डॅनिअल बर्गलिन्ड म्हणाले की, 'आम्हाला असे कोणतेही पुरावे मिळाले नाही ज्यातून हे सिद्ध होईल की, सी-सेक्शन आणि लठ्ठपणा विकसित होण्यात कोणताही संबंध आहे. यातून हे स्पष्ट होतं की, कोणती महिला तिच्या बाळाला कशाप्रकारे जन्म देते मग ते नॉर्मल असो वा सिजेरियन. याचा लठ्ठपणाची कोणताही संबंध नाही.
सिजेरियनची संख्या वेगाने वाढली
(Image Credit : medicalnewstoday.com)
रिपोर्ट्सनुसार सी-सेक्शन डिलिव्हरीची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे. १९९० मध्ये जगभरात ६.७ टक्के डिलिव्हरीच सिजेरियन व्हायच्या. २०१४ मध्ये सी-सेक्शन डिलिव्हरींची संख्या वाढून १९.१ टक्के झाली आहे. या वाढत्या संख्येमुळे नेमका सिजेरियनचा आरोग्यावर काय परिणाम होतो यावर रिसर्च केला जात आहे.
कसा केला रिसर्च?
(Image Credit : DailyMail)
या रिसर्चसाठी १८ वर्षांच्या साधारण १ लाख तरूणांच्या बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्सची तुलना करण्यात आली. आणि यासाठी त्यांना ३ गटात विभागण्यात आलं. पहिला नॉर्मल डिलिव्हरीने जन्मलेला, दुसरा इलेक्टिव सी-सेक्शनने झालेला, तिसरा नॉन इलेक्टिव सी-सेक्शनने जन्मलेला. डेटानुसार, ५.५ आणि ५.६ टक्के पुरूष ज्यांचा जन्म इलेक्टिव किंवा नॉन इलेक्टिव सी-सेक्शनने झाला होता, त्यांच्यात लठ्ठपणा आढळून आला. तर नॉर्मल डिलिव्हरीने जन्मलेल्या ४.८ टक्के पुरूषांमध्येच लठ्ठपणाची लक्षणे दिसली.