एका नव्या रिसर्चमधून समोर आले आहे की, मशरूम खाल्ल्याने मध्य वयाच्या आणि वयोवृद्धांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये ४० ते ७९ वयोगटातील ३६४९९ पुरूषांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांनी १९९० मध्ये मियागी कोहोर्ट स्टडी आणि १९९४ मध्ये ओहसाकी कोहोर्ट स्टडीमध्ये भाग घेतला होता.
asianage.com दिलेल्या वृत्तानुसार, या रिसर्चनुसार आठवड्यातून एकदा मशरूम खाणारे आणि आठवड्यातून दोनदा खाणाऱ्यांच्या तुलनेतून हे समोर आले आहे की, आठवड्यातून दोनदा मशरूम खाल्ल्याने ८ टक्के प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी आढळला. तेच, आठवड्यातून तीनदा मशरूम खाणाऱ्यांमध्ये १७ टक्के प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी आढळला.
जपानच्या तोहोकु युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रमुख लेखक शू झांग म्हणाले की, मशरूमच्या प्रजातींबद्दलची माहिती एकत्रित केली गेली नव्हती. त्यामुळे हे सांगणं कठिण आहे की, आमच्या रिझल्टमध्ये कोणत्या प्रजातीच्या मशरूमने योगदान दिलं.
प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षणे कोणती?
(Image Credit : health.clevelandclinic.org)
सुरुवातीला काही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, अॅडव्हान्स स्टेजमध्ये लघवीत अडथळा येणे, लघवीची गती कमी होणे, वीर्यातून रक्त येणे, हाडे दुखणे, ‘इरेक्टायल डिसफंक्शन’ सारखेही लक्षणे दिसून येतात.
निदान कसे केले जाते?
सुरुवातीच्या टप्प्यात ‘डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन’ (डीआरई) आणि ‘प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन’ (पीएसए)च्या तपासणीतून आणि नंतर ‘अल्ट्रासाउंड’ आणि ‘प्रोस्टेट बायोप्सी’च्या माध्यमातूनही प्रोस्टेट कॅन्सरचे निदान होते.
प्रोस्टेट वाढण्याचे कारण?
जास्त वय, प्रोस्टेट किंवा ब्रेस्ट कॅन्सरची अनुवांशिक्ता व लठ्ठपणा हे प्रोस्टेट वाढण्याचे कारण ठरते.