Heart Disease Risk: जगभरात हृदयरोग आणि डायबिटीसच्या रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारताला तर डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. अशात एका नव्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, हार्ट अटॅक आणि डायबिटीजसारख्या आजारांसोबत लढण्यासाठी मोकळ्या हवेत आणि पार्कसारख्या ठिकाणी फिरल्याने फायदा मिळू शकतो.
या रिसर्चनुसार, निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने हृदयरोग आणि डायबिटीससंबंधी समस्या कमी होते. ब्रेन, बिहेवियर अॅंड इम्युनिटी जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये शरीरात होणारा सूज इन्फ्लेमेशनवर फोकस करण्यात आला आहे. याआधीही काही रिसर्चमध्ये सांगण्यात आले होते की, निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने केवळ मेंटलच नाही तर फिजिकल हेल्थही चांगली होते. पण आता नव्या रिसर्चमध्ये हृदयरोगासारख्या घातक आजारांसाठी निसर्गाचे फायदे सांगण्यात आले आहेत.
रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, निसर्गाच्या पुन्हा पुन्हा संपर्कात आल्याने तीन वेगवेगळ्या इंडीकेटर्सना फायदा मिळतो. यात इंटरल्यूकिन 6, सी रिअॅक्टिव प्रोटीन आणि सायटोकिन्स यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या कॉर्नेल विश्वविद्यालयात मनोविज्ञान विभागाचे प्रोफेसर एंथनी ओंग यांच्या नेतृत्वातील टीमने सांगितलं की, या इन्फेलेमेश वाढवणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून स्टडी एक बायोलॉजिकल स्पष्टीकरणं देते की, निसर्ग लोकांच्या आरोग्यात का आणि कशी सुधारणा करतो.
निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने कमी होतं इन्फ्लेमेशन
रिसर्चमध्ये खासकरून हे सांगण्यात आलं आहे की, निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने हार्ट डिजीज आणि डायबिटीससारख्या क्रोनिक आजारांना रोखलं आणि मॅनेज केलं जाऊ शकतं. या रिसर्चसाठी टीमने 1,244 लोकांची निवड केली होती आणि सगळ्यांच्या फिजिकल हेल्थ मूल्यांकन करण्यात आलं.
रिसर्चचे लेखक एंथनी ओंग म्हणाले की, हे केवळ याबाबत नाहीये की, तुम्ही किती वेळ बाहेर फिरता किंवा किती वेळ बाहेर राहता. हे त्यांच्या अनुभवांच्या गुणवत्तेबाबत आहे. ओंग पुढे म्हणाले की, लोकसंख्या, आरोग्य, औषध आणि वेलनेससारख्या व्हेरिएबल्सला नियंत्रित करतेवेळी टीमला आढळलं की, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने सूजेची लेव्हल सतत कमी होत आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने लोकांचं आरोग्य चांगलं राहत आहे.