शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
2
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
3
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
4
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
5
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
6
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
7
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
8
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
9
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
10
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
11
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
12
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
13
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
14
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
15
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
16
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
17
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
18
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
19
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
20
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

मोठं यश! डासांच्या थूंकीपासून तयार केली जाईल सुपर वॅक्सीन, थांबेल जगभरातील महामारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:42 PM

साधारण 5 वर्षांआधी डासांनी भरलेल्या एका ऑफिसमध्ये बसलेल्या जेसिका मॅनिंग यांच्या डोक्यात एक मोठी वेगळी आयडिया आली. 

सध्या जगभरात कोरोना व्हायरसची वॅक्सीन बनवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. अशातच एका वेगळ्या वॅक्सीनची माहिती समोर आली आहे. साधारण 5 वर्षांआधी डासांनी भरलेल्या एका ऑफिसमध्ये बसलेल्या जेसिका मॅनिंग यांच्या डोक्यात एक मोठी वेगळी आयडिया आली. 

जेसिका मॅनिंग यांनी विचार केला की, मलेरियाची वॅक्सीन शोधण्याऐवजी डासांपासून तयार होणाऱ्या सर्वच विषाणूंना नष्ट करण्यासाठी एकत्र एक प्रयत्न केला जावा. अमेरिकेतील संसर्गजन्य रोग संस्थेत काम करणाऱ्या वैज्ञानिक जेसिका यांचं मत आहे की, डासांच्या लाळेत आढळणाऱ्या प्रोटीनपासून एक वैश्विक वॅक्सीनचं निर्मित केली जाऊ शकते.

जर वॅक्सीन तयार करण्यात यश मिळालं तर मनुष्याच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या सर्वच विषाणूंपासून होणाऱ्या आजारांपासून रक्षण होईल. यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झीका, यलो फीवहर, मायरो इत्यादी रोगांपासून मनुष्याचा बचाव होऊ शकतो.

जेसिका म्हणाल्या की, 'आपल्याला आणखी जास्त रचनात्मक पद्धती वापराव्या लागतील'. ही वॅक्सीन फार उपयोगी ठरेल ज्याने अनेक आजारांपासून बचाव होईल.

गुरूवारी प्रसिद्ध लान्सेट जर्नलमध्ये जेसिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा रिसर्च प्रकाशित झाला. यात डासांच्या थूंकीपासून तयार केलेल्या वॅक्सीनच्या पहिल्या क्लीनिकल ट्रायल परिणामाबाबत सांगण्यात आले. या ट्रायलमधून हे कळून येतं की, डासांच्या लाळेपासून तयार वॅक्सीन Anopheles सुरक्षित आहे. याने अ‍ॅंटीबॉडी तयार होते आणि कोशिकांचा रिस्पॉन्स मिळतो. एक वैज्ञानिक मायकल मॅकक्रॅकन म्हणाले की, प्राथमिक परिणाम चांगले आहेत.

मॅकक्रकन म्हणाले की, 'हे फार मोठं यश आहे. डास हे पृथ्वीवरील सर्वात घातक जीवांपैकी एक आहेत'. केवळ मलेरियाने दरवर्षी 4 लाख लोकांचा जीव जातो. यातील जास्तीत जास्त मृत्यू गरीब देशांमध्ये होतात, जिथे वॅक्सीनच्या शोधावर फार काम होत नाही. आणि त्यासाठी पैसाही दिला जात नाही. ग्लोबल वार्मिंगमुळे आता डास आणखी जास्त देशांमध्ये आपली पोहोच वाढवत आहेत.

जगात कोरोना व्हायरसच्या थैमानात आता वैज्ञानिक आपला फोकस संसर्गजन्य आजारांवर आणि वॅक्सीनच्या शोधावर करत आहेत. खासकरून त्या विषाणूंवर फोकस आहे जे डासांव्दारे पसरतात. असे मानले जाते की, कोरोना व्हायरस वटवाघळांमधून पसरला होता आणि आता जगभरात 74 लाख लोकांना याची लागण झाली आहे. तर 4 लाख 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला.

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधन