Walking Benefits : पायी चालणं हा एक सगळ्यात सोपा आणि फायदेशीर व्यायाम मानला जातो. पायी चालल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. इतकंच नाही तर जर तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचं असेल आणि निरोगी जगायचं असेल तर पायी चालण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, शारीरिक हालचालीचा आयुष्य वाढण्याशी आणि निरोगी जगण्याशी संबंध आहे.
रिसर्चमध्ये आढळून आलं की, जर सगळ्यात कमी सक्रिय लोक रोज ११० मिनट ते १६० मिनिटे पायी चालले किंवा त्यांनी फिजिकल अॅक्टिविटी केली तर त्यांचं आयुष्य ११ वर्षांनी आणखी वाढेल. चालल्याने केवळ शरीर फीट राहतं असं नाही तर हृदय, मेंदू आणि इतर महत्वाचे अवयवही मजबूत होतात.
पायी चालण्याचे फायदे
पायी चालल्याने ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते, हार्ट डिजीजचा धोका कमी होतो आणि मेंदुच्या क्रिया व्यवस्थित होतात. त्याशिवाय नियमितपणे चालल्याने लठ्ठपणा, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासही मदत मिळते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं
पायी चालल्याने मानसिक आरोग्यावर खोलवर चांगला प्रभाव पडतो. पायी चालल्याने डिप्रेशन आणि चिंता कमी करण्यास मदत मिळते. कारण पायी चालल्याने शरीरात एंडोर्फिनचं उत्पादन होतं, हा एक हॅप्पी हार्मोन आहे.
वेगाने चालण्याचे फायदे -
अमेरिकन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार चालण्याचे तुम्हाला खालील फायदे होतात.
1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.
2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
5) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
8) चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
10) चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
11) चालण्यामुळे झोपही चांगली लागते.