Health Tips : वजन कमी करण्यासाठी कोणताही व्यायाम किंवा डाएट करता वजन कमी होत असले तर ते कुठल्या तरी आजराची प्राथमिक सुरुवात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विशिष्ट आजरांमध्ये वजन कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वजन कमी झाल्यास तात्काळ डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, जर एखादा आजार असेल तर त्याचे निदान होऊन वेळेत उपचार करणे शक्य होते.
अनेक वेळा नागरिक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करूनही वजन होत नाही. विनाकारण वजन कमी होता असेल तर हे आजार असण्याची शक्यता असते. जलद गतीने वजन वाढण्याची कारणे शोधणे गरजेचे असते. त्यासाठी काही तपासण्या आणि रक्त्ताच्या चाचण्या करणे गरजेचे असते. त्यातून आपल्याला नेमके कोणत्या कारणांमुळे वजन कमी होत आहे याचे निदान होणे शक्य असते. त्यानुसार त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. कारण वजन कमी करण्याचा परिणाम शरीरातील विविध अवयवांवर होत असतो, त्यामध्ये प्रामुख्याने हृदय आणि मेंदूचा समावेश आहे.डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक,जेजे रुग्णालय
भूक न लागणे : या आजरांमध्ये अनेक वेळा भूक मंदावते, त्यामुळे सुद्धा वजन कमी होत असते. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांकडे जाणे गरजेचे आहे.
...तर डॉक्टरचा सल्ला घ्या
डायबिटीस, थायरॉइड, कॅन्सर, मानसिक ताण तणाव, हृदयविकार या आजरांमध्ये वजन कमी होण्याचा धोका असतो. विनाकारण वजन कमी होता असेल तर हे आजार असण्याची शक्यता असते..तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. कोणतेही कारण नसताना वजन कमी होत असेल तर कुठला तरी आजार असण्याची शक्यता आहे.