रात्री अचानक 'बाळ' रडतेय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2016 10:35 AM
जन्मताच बाळाचे रडणे ही सामान्य बाब आहे.
जन्मताच बाळाचे रडणे ही सामान्य बाब आहे. मात्र जन्मानंतरही काही महिने बाळ झोपेतून जागी होऊन रडू लागतात. बाळ काहीच सांगु शकत नसल्याने पालकांना रडण्याचे नेमके कारण समजत नाही. त्यामुळे पालक चिंतेत पडतात. आपला बाळ रात्री जागे होऊन जर रडत असेल तर कदाचित हे कारणे असू शकतात. * बाळाला होणारा शारीरिक त्रास हे एक मुख्य कारण रडण्याचे असू शकते. याचबरोबर वातावरणातील तापमानात वाढ झाली किंवा तापमान कमी असेल तर बाळ झोपेतून जागी होऊन उठून रडतात. * बाळाच्या झोपण्याची जागा आरामदायी नसेल तर बाळ अस्वस्थ होतो, त्यामुळे त्याला झोप येत नाही म्हणून तो रडतो. * मुले थोडी मोठी झाली की, त्यांची भूकही वाढते. त्यांना लवक र भूक लागते. तसेच त्यांची झोपही काही प्रमाणात कमी होते. या कारणानेही बाळ मध्यरात्री रडतात.* रात्री लावलेला डायपर ओला झाल्यास आणि तो वेळेवर बदलला नाही तर त्याचा त्रास होऊन ते रडतात.* बºयाचदा रात्री बाळ एकटे झोपलेले असते. त्याच्याजवळ कोणी नसल्याने असुरक्षित वाटल्याने ते रडतात.