सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी-खोकला होणं ही साधारणं गोष्ट आहे. परंतु, जर तुम्हाला 12 महिन्यांपैकी 10 महिने सर्दी आणि खोकला राहत असेल किंवा वातावरण बदलल्यानंतरच नाही तर, इतर दिवशीही सर्दी-खोकल्याने हैराण होत असाल तर घाबरून जाऊ नका. अनेक लोकांना ही समस्या जाणवते. जाणून घेऊयात असं सतत आजारी पडण्यामागील कारण नक्की काय आहे...
सामान्यतः सर्दी-खोकल्यासारखा आजार हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज ट्रान्सफर होतो. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनच्या मते, कमीत कमी 20 सेकंदांपर्यंत व्यवस्थित हात धुणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त जेवण्याआधी, वॉशरूम यूज केल्यानंतर, एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेतल्यानंतर आणि खोकला आल्यास, शिंकल्यानंतर हात व्यवस्थित धुणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं करत नसाल तर तुम्हालाही सर्दी-खोकला होण्याची भिती असते.
ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती फार कमी असते, अशा व्यक्तींना एखादं इन्फेक्शन लगेच होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याची अनेक कारणं असतात. ज्यामध्ये ऑटोइम्यून प्रॉब्लम्स आणि अनेक प्रकारच्या आजारांचा समावेश होतो. अनेकदा काही औषधांमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
जर तुमचं शरीर डिहायड्रेट असेल किंवा शरीरात पाण्याची कमतरता असेल तेव्हा तुमची रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. शरीर हायड्रेट ठेवून तुम्ही स्वतःचा या आजारांपासून बचाव करू शकता.
हातांमार्फत शरीरामध्ये सर्वात जास्त बॅक्टेरिया शरीरामध्ये जातात. जर तुम्ही तुमचे हात व्यवस्थित स्वच्छ केले नाही किंवा जर एखाद्या अस्वच्छ ठिकाणी तुम्ही हात लावला आणि त्यानंतर हात स्वच्छ धुतले नाहीत तर हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करतात.
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल तर तुमची सर्दी-खोकल्याची समस्या आणखी वाढते. एवढंच नाही तर सर्दी-खोकल्याची लक्षणंदेखील वाढतात. जर तुम्हाला सर्दी खोकल्याची समस्या 7 दिवसांआधी ठिक नाही झाली तर डॉक्टरांकडून सल्ला घेणं किंवा त्याच्याकडून चेकअप करणं गरजेचं आहे.