सध्याच्या धकाधकीच्या महिला असो किंवा पुरुष दोघेही केसगळतीने त्रस्त असतात. त्यातच आता राज्यात अनेक ठिकाणी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात तर तुलनेने अधिकच केस गळतात असे अनेकांना जाणवले असेल. होय, ते खरेही आहे. थंडीमध्ये केसगळतीची समस्या जास्त भेडसावते. मात्र घाबरुन जाऊ नका कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ऋतुमानानुसार बदल करायला शरिरालाही थोडा वेळ लागणारच. तरी केस गळतीची समस्या अगदीच गंभीर असेल तर मात्र वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणेच उत्तम आहे. थंडीत केस गळण्याची कारणे काय ?हिवाळ्यात जशी त्वचा कोरडी पडते तसेच इतरही बदल शरिरात होत असतात. थंडी सुरु झाली की टाळू कोरडा होतो. परिणामी केसही हळूहळू कोरडे पडायला सुरुवात होते. केसांची मूळं कमकुवत होतात. यामुळेच केस गळण्यास सुरुवात होते. केसात जर खूप कोंडा होत असेल तर थंडीत ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे सलून किंवा पार्लरमध्ये जाऊन महागडे उपाय करण्यापेक्षा घरीच दर दोन दिवसाआड तेल लावून केस स्वच्छ धुतलेले केव्हाही चांगले. केसगळतीवर उपाय काय ?
केसगळतीवर उपाय करायचे असतील तर कुठेही जाण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या, घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरुन तुम्ही केस गळती कमी करु शकता.
कोरफड किंवा कडुनिंबाचा रस
कोरफड आणि कडुनिंब हे दोन्ही केसगळती त्वरित कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. कोरफडीमध्ये फॉलिक अॅसिड असते. तसेच व्हिटॅमिन ए, सी, बी१, बी२, बी३ यांचा समावेश असतो. आठवड्यातून दोन वेळा कोरफडीचा रस केसांच्या मुळांना लावल्यास केस घनदाट आणि मजबूत होतात. तसेच कडुनिंबामध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर अॅंटेऑक्सिडंट्स असतात. जे केसांच्या मुळाशी जाऊन असलेला कोंडा कमी नाहीसा करतात.
बदामाचे तेल
बदामाचे तेलही केसांसाठी गुणकारी आहे. इतर तेलांपेक्षा हे कमी चिकट असते. केसांना फाटे फुटले असतील तर बदामाच्या तेलामुळे ही समस्या दूर होऊ शकते. तसेच हे तेल केसांसाठी कंडिशनर म्हणूनही उत्तम ठरते.
कांद्याचा रस
कांद्यामध्ये अॅंटीबॅक्टेरियल, अॅंटीफंगल आणि अॅंटीऑक्सिडंट असतात. तसेच कांद्याचा रस मेंदूतील रक्ताभिसरण वाढवतो. केस लांब आणि घनदाट ठेवण्यासाठीही कांद्याचा रस गुणकारी आहे. कांद्याला वास येतो यासाठी कांदा बारिक चिरुन त्याचा रस लावला तर केसगळती कमी होते.