- मयूर पठाडेतुम्हाला कुठलं व्यसन आहे? मला माहीत आहे, आपल्यापैकी कोणालाही एकही व्यसन नसेल. तुम्ही म्हणाल, आहेत काही, पण त्याला व्यसन म्हणता येणार नाही, कारण माझा त्यावर पूर्णत: कंट्रोल आहे. मी काही त्या व्यसनांच्या अधिन झालेलो नाही...काहीही असो, तुम्हाला एखादं व्यसन असो किंवा नसो, आपल्याला व्यसन आहे, हे तुम्हाला मान्य असो, नसो, पण असलंच तर ते सोडणं किती कठीण असतं हे प्रत्येकालाच माहीत आहे..तंबाकू, सिगरेट, दारू.. व्यसनांचेही किती प्रकार.. ड्रग्ज, अंमली पदार्थांचं व्यसन तर सर्वात घातक मानलं जातं. का? ते किती घातक आहेत, हे साºयांनाच माहीत आहे. आणि ही व्यसनं सोडणंही त्याहून कठीण.पण अनेकांना माहीत नसेल, आणखी एक व्यसन आहे आणि ते सोडणं सर्वात कठीण आहे. शंभरातले ९९ लोक त्याला व्यसन म्हणणारही नाहीत, कारण अनेकांना ते व्यसन आहे, हेच माहीत नाही. कोणतं आहे हे व्यसन?शास्त्रज्ञांच्या मते साखरेचं व्यसन सर्वात घातक, कारण इतर कोणत्याही व्यसनांपेक्षा तुमच्या शरीरावर ते जास्त विपरित परिणाम घडवतं आणि साखरेचं व्यसन सोडणंही तितकंच कठीण. इतर व्यसनं तरी तुम्ही एकवेळ सोडू शकाल, पण साखरेचं व्यसन जर तुम्हाला लागलं असेल तर ते सोडणं मात्र महाकठीण. त्यासाठी तितकीच मोठी इच्छाशक्ती हवी आणि चिकाटी. तरच या व्यसनातून तुम्ही सुटू शकता.भारतात मधुमेहीचे रुग्ण जगात सर्वाधिक आहेत, यावरूनही ही गोष्ट आपल्या लक्षात यावी. कारण साखरेचं, गोड खाण्याचं व्यसन आपल्याला लागलेलं आहे, हेच मुळात अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे ते मान्य करणं तर आणखी पुढची गोष्ट झाली!त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला जर साखरेचं म्हणजेच गोड खाण्याचं व्यसन लागलं असेल किंवा त्या टप्प्यात तुम्ही असाल तर त्याला वेळीच आटोक्यात आणा, जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्न करा, तुमचं हे व्यसन नक्कीच सुटेल..
साखरेचं व्यसन ड्रग्जपेक्षाही घातक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 6:48 PM
गोडाचं व्यसन जर तुम्हाला लागलं असेल तर व्हा वेळीच सावध..
ठळक मुद्दे शास्त्रज्ञांच्या मते साखरेचं व्यसन सर्वात घातक.इतर कोणत्याही व्यसनांपेक्षा तुमच्या शरीरावर ते जास्त विपरित परिणाम घडवतं.साखरेचं व्यसन सोडणंही तितकंच कठीण. इतर व्यसनं तरी तुम्ही एकवेळ सोडू शकाल, पण साखरेचं व्यसन सोडणं महाकठीण. त्यासाठी तितकीच मोठी इच्छाशक्ती आणि चिकाटी हवी.