शरीराला निरोगी ठेवण्यासाठी साखर आणि मिठाची महत्वाची भूमिका असते. हे दोन्ही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी घेतल्यास शरीरासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊ साखर आणि मीठ जर जास्त प्रमाणात घेतलं तर याचे हृदयावर काय वाईट परिणाम होतात.
जेव्हाही आपण ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधी आजारांचा विचार करतो तेव्हा सर्वातआधी विचार मिठाचा येतो. त्यामुळे अनेकजण कमी मीठ असलेली डाएट घेतात. पण हा विचार करणं चुकीचं ठरेल की, सोडिअम कमी केल्याने हृदयाला धोका होत नाही.
मिठाचा हृदयावर काय होतो परिणाम?
सोडिअमचं सेवन कमी केल्याने काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. पण काही लोकांमध्ये सोडिअमचं प्रमाण कमी झाल्यास ब्लड प्रेशर वाढतं. कमी सोडिअमच्या प्रमाणामुळे हार्ट रेट आणि हृदयावर दबावही वाढू शकतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, व्यक्तीने एका दिवसात १.५ ग्रॅमपेक्षा कमी मिठाचं सेवन करू नये. असं केलं तर हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. तेच ५० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी आणि डायबिटीज रूग्णांनी दररोज १.५ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये.
सोडिअम एक महत्वाचं पोषक तत्व आहे आणि अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, हृदय निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी दररोज ३ ते ६ ग्रॅम याचं सेवन करावं. जास्तीत जास्त लोक याच प्रमाणात सोडिअम घेतात.
साखरेचा हृदयावर होणारा परिणाम
पॅक्ड फूड्समध्ये ७५ टक्के आर्टिफिशिअल शुगर असते. शुगरचं जास्त प्रमाण हार्मोन्सचं नुकसान करतं. ज्यामुळे केवळ डायबिटीजच नाही तर हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढू शकतो. जे लोक दररोज एडेड शुगरपेक्षा २५ टक्के जास्त किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरींचं सेवन करतात त्या लोकांमध्ये हार्ट अटॅकने जीव जाण्याचा धोका त्या लोकांमध्ये ३ पटीने जास्त असतो जे लोक एडेड शुगरपेक्षा १० ट्क्के कमी कॅलरी घेतात.
साखरेच्या जास्त सेवनाने लठ्ठपणा, दातांशी संबंधित समस्या, ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकची समस्या होऊ शकते. मात्र, अमेरिकन गाइडलाइन कमेटीने साखरेच्या तुलनेत मिठाला अधिक नुकसानकारक मानलं आहे. आणि फूड इंडस्ट्रीला सोडिअमचं प्रमाण कमी करण्यास सांगितलं आहे.
लो सोडिअम फूडचा प्रभाव आपल्या शरीरावर तसाच होतो जसा जास्त एडेड शुगर खाल्ल्याने होतो. जास्त एडेड शुगरने हायपरटेंशन, हृदयरोग आणि लवकर मृत्यूचा धोका वाढतो.
सोडिअम आणि शुगरचं संतुलित सेवन करण्यासाठी प्रोसेस्ड फूड खाणं पूर्णपणे बंद करायला हवं. आणि त्याऐवजी नॅच्युरल फूड्स ज्यात नॅच्युरल मीठ आणि साखर असते ते खायला हवे. प्लांट फूड्समध्ये सोडिअम पोटॅशिअममुळे संतुलन राहतं. पाणी, फायबर आणि इतर तत्वांमुळे योग्य प्रमाणात नॅच्युरल शुगर मिळते. ब्लड प्रेशर कंट्रोल आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डाएटमध्ये ताजी फळं-भाज्या घ्याव्यात.
(टिप : वरील लेखातील मुद्दे हे केवळ माहिती म्हणून देण्यात आलेले आहेत. यावर आम्ही कोणताही दावा करत नाहीत. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्याआधी एकदा डॉक्टरांशी संपर्क साधा.)