कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण अनेक काढे पितो. बरेचदा हे काढे पिताना नाक मुरडले जाते. त्यातही वाढत्या उन्हाच्या काहिलीत गरमागरम काढे पिणार कोण? त्यामुळेच आम्ही एक थंडगार पर्याय तुमच्यासाठी आणला आहे. तो म्हणजे केरळचं प्रसिद्ध कुलुक्की सरबत. या सरबताचे फायदे अगणित आहेत. हे सरबत कसे बनवायचे याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कसं बनवावं कुलुक्की सरबत?
साहित्य :चिया सीड्स :अर्धा चमचानारळ पाणी :४ कपगुळाची पावडर : पाव चमचालिंबू १मीठ चवीनुसारमिरची १आलं चवीनुसारपुदीन्याची ८, १० पानबर्फ
कृती:
सरबत बनवण्याआधी १५ ते २० मिनिटे चिया सीड्स पाण्यात भिजवून ठेवावेत.त्यानंत नारळाचे पाणी घ्यावं व त्यात लिंबाचा रस मिसळावा.त्यानंतर त्यात गुळ, मीठ आणि चिया सीड्स घालाव्यात.हिरवी मिरची कापून घालावी. आवडत असेल तर आलंही घाला. आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल.बर्फाचे तुकडे आणि वरून पुदीन्याची पान घालून सर्व्ह करा.
आहे ना झटपट आणि रुचकर? चला आता याचे फायदे जाणून घेऊयात
शरीराला थंडावा मिळतो - उन्हाळ्यात आपण वारंवार थंड पाणी पितो. हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्याऐवजी कुलुक्की सरबत प्या. यातील नारळ पाणी तुमच्या शरीराला थंडावा देतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते- या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेच आहे. त्यावर हे सरबत म्हणजे अत्यंत उत्तम उपाय आहे. यात लिंबू असल्याने व्हिटॅमीन सी असतेच तसंच नारळपाण्याचे असंख्य फायदे आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पोषक तत्वांनी युक्त- कुलुक्की सरबत चिया सीड्स, लिंबू, नारळ पाणी आणि गुळापासून बनते. चिया सीड्स प्रोटीनयुक्त असतात, त्यात कॅल्शियम, ओमेगा-3, मॅग्नीशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स असतात. नारळ पाण्यात फायबर असते. त्याचबरोबर पोटॅशिअम असते. गुळात अनेक व्हिटॅमिन्स सोबतच कॅलशिअम असतं.
हाडे मजबूत होतात- या सरबतामध्ये पुरेपुर कॅल्शियम असते त्यामुळे हाडं मजबूत होतात. ज्यांना घुडग्याचं दुखणं असेल त्यांनी तर हे सरबत नक्की प्यावे.
पोटाच्या समस्या दूर होतात- सध्या पोटाचे विकार वाढू लागले आहेत. अपचन, पित्त, गॅस अशा समस्या सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये जाणवतात. या सरबतात फायबर अनेक व्हिटॅमिन्स असल्याने पोटविकारांवर हे सरबत फायद्याचे ठरते.