Summer Body Care Tips : उन्हाळा सुरू झाली की त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. शरीरामध्ये उष्णता वाढल्याने वारंवार घाम येतो. वाढती गर्मी आणि घामामुळे त्वचेला खाज तसेच घामोळे येण्याचा त्रास अनेकांना होतो. वारंवार घामोळे खाजवल्यामुळे अंगावर जखम देखील होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा त्रास वाढू लागतो त्यामुळे यावर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. ज्यामुळे अंगावर जखमा होणार नाहीत आणि शरीराला थंडावा जाणवेल.
घामोळ्याची समस्या काय नवीन नाही आहे. पूर्वीच्या काळ लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय करत असत. ते उपाय कोणते जाणून घ्या...
१) कडूलिंबाची पाने -
उन्हाळ्यामध्ये शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. त्यामुळे अंगाला येणारा घामाचा वास तसेच खाज, जळजळ यांसारखे प्रकार टाळण्यासाठी नियमितपणे स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी. त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाका आणि आंघोळ करा, त्यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो. तसेच घामोळे येत नाहीत, असं तज्ज्ञांच मत आहे.
२) मुलतानी माती-
त्वचेला थंडावा मिळण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग केला जातो. उन्हाळ्यात मुलतानी माती त्वचेसाठी खुपच फायदेशीर ठरते. जर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीचा लेप लावावा त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.
३) काकडीच्या फोडी-
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळते. त्यामुळे काकडी कापून घ्यावी आणि त्याचे काप घामोळे आलेत त्या ठिकाणी लावावे. असं केल्याने घामोळ्यामुळे होणारी जळजळ कमी होते.
४) दही- बेसन लेप-
उन्हाळ्यामध्ये घामोळ्यांचा जास्तच त्रास होत असेल तर जळजळ होत असलेल्या ठिकाणी दही-बेसणाचा लेप लावावा. हा लेप त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसण्यासाठीच नाही तर हा लेप घामोळ्यांवरही फायदेशीर ठरतो.
लेप लावण्याचे फायदे-
१) हा लेप लावल्यानंतर अंगाला साबण लावण्याची गरज भासत नाही.
२) त्वचेवरील घाम, काळपटपणा तसेच डेड स्किन सेल्स नाहीशा होतात. एकप्रकारे हा लेप स्क्रबिंगप्रमाणे काम करतो.