सूर्यस्नान करा, हृदयरोग-मधुमेह पळवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2016 6:13 PM
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेहासारखे असाध्य आजार बहुतांश लोकांना कळाले असून, त्यासाठी बरेच उपचार केले जातात. पण अपेक्षित फायदा होताना दिसत नाही
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेहासारखे असाध्य आजार बहुतांश लोकांना कळाले असून, त्यासाठी बरेच उपचार केले जातात. पण अपेक्षित फायदा होताना दिसत नाही. मात्र, एका नव्या संशोधनानुसार पुरेशा प्रमाणात विटॅमिन ‘डी’ घेतल्याने तसेच सूर्यस्नानामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होत असल्याचे समोर आले आहे. आहारात चरबीयुक्त पदार्थ वाढले की पचनसंस्थेवर परिणाम होऊन चयापचयाच्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्येला शरीरातील विटॅमिन ‘डी’ची कमतरता कारणीभूत ठरते. त्यामुळे शरीरातील गट जिवाणू अस्थिर होतात, असे संशोधकांना आढळून आले. अभ्यासानुसार, विटॅमिन ‘डी’चे शरीरातील प्रमाण पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. विटॅमिन ‘डी’ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यस्नान, पूरक अहार घेणे आवश्यक असल्याचे अमेरिकेतील सिन्हाई आरोग्य केंद्राचे स्टिपेन पॅन्डोल यांनी म्हटले आहे.एकूण लोकसंख्येच्या सुमारे एकचतुर्थांश प्रौढांना चयापचायच्या समस्येने ग्रासले आहे. ही समस्याच मधुमेह आणि हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत ठरते. अतिस्थूलतेच्या लक्षणांसह रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, उच्च रक्तदाब अथवा उच्च कोलेस्ट्रॉल ही याची लक्षणे आहेत. चयापचायाचा सिंड्रोम होण्यासाठी विटॅमिन ‘डी’ची शरीरातील कमतरता कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले.विटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे आतड्यातील जिवाणूंचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विटॅमिन ‘डी’असलेला पूरक अहार घेणे आवश्यक आहे. हे संशोधन फ्रंटियर्स फिजिओलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.